शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

पारोळ्यात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 22:34 IST

शेतकरी हिरामण बाबूराव बारी यांनी कर्जामुळे आत्महत्या केली

ठळक मुद्देवि.का.संस्था व हातउसनवारीचे होते कर्जशेतातील घरात संपविले स्वत:ला

पारोळा, जि.जळगाव : शहरातील मडक्या मारुती भागातील शेतकरी हिरामण बाबूराव बारी (७०) यांनी कर्जामुळे काही तरी विषारी द्रव पदार्थ सेवन करून आत्महत्या केली ही घटना ७ रोजी सायंकाळी चारला घडली.येथील शहरातील मडक्या मारुती भागातील रहिवासी हिरामण बाबूराव बारी हे वंजारी खुर्द भागात असलेल्या शेतीत मका व गहू पेरणी केली होती. ते नेहमीप्रमाणे ७ रोजी शेतात गेले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न परतले नाही. त्यांचा लहान मुलगा देवीदास हा वडील शेतातून का आले नाही. म्हणून तो त्यांना पाहण्यासाठी शेतात गेला होता. वडील शेतातील घराच्या ओट्यावर पडलेले दिसले. त्यांच्या नाका तोंडातून फेस येत होता. देवीदास हा घाबरला व रिक्षाने उपचारासाठी पारोळा कुटीर रुग्णल्यात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंखे यांनी शर्थीचे प्रयन्त केले. पण उपचारादरमान्य त्यांचा मृत्यू झाला.हिरामण बारी हे गेल्या अनेक दिवसांपासून वैफल्यग्रस्त अवस्थेत होते. या वर्षी हातचा सर्व हंगाम गेल्याने निराशा आली होती. त्यांच्यावर हात उसनवारीचे ७८ हजार खाजगी बँकेचे व वि.का. संस्थेचे ७५ हजार रुपये असे कर्ज होते आणि या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.पारोळा पोलिसांना सुनील बारी यांनी माहिती दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. तपास पो.हे.काँ. बापूराव पाटील करीत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ८ रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याParolaपारोळा