तळेगाव, ता.जामनेर : परिसरात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन आणि त्यामुळे झालेली वाताहत यामुळे मात्र शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांनी तर उभ्या पिकात गुरे घालून पीक नष्ट केले.तळेगाव येथील शेतकरी दिवाकर अंबादास कुलकर्णी व चंद्रशेखर पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या शेतात वांगे, कोबी यासह भाजीपाला पीक लावले. लावलेल्या पिकांचा खर्चदेखील निघेनासा झाला आहे. कोबी बाजारात नेली असता लिलाव झाला नाही व वाहतूक खर्चही गेला. त्यामुळे वैतागून त्यांनी आपल्या उभ्या पिकात गावातील गाई, गवार घालून पीक नष्ट केले. तसेच मेथी, कोथिंबीर, वांगे यासह अन्य भाजीपाला पिकांचेदेखील भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चदेखील निघत नाही. त्याचप्रमाणे परिसरात टरबूज लागवडदेखील मोठ्या प्रमाणात आहे. टरबुजाचेदेखील भाव पडले आहेत. चार रुपये किलोप्रमाणे व्यापारी माल मागत असल्याने शेतकऱ्यांपुढे खर्च कसा काढावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने उभ्या पिकात शेतकऱ्यांनी घातली गुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:25 IST