फैजपूर, ता.रावेर, जि.जळगाव : रावेर व यावल तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त व अवकाळी पावसाने कापणीस आलेली ज्वारी, मका, कापूस, सोयाबीन सर्वच पिके अति पावसाने नष्ट झालेली आहे. पंचनामे करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई, सरसकट कर्जमाफी व एकरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी या मागण्यांसाठी शुक्रवारी फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर काँग्रेस, राष्ट्रवादीतर्फे आमदार शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी मोर्चा काढण्यात आला. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना शेतकºयांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी साडेदहाला सुभाष चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. फसवणीस सरकारविरुद्ध विविध घोषणा देण्यात आल्या. संपूर्ण परिसर दणाणलेप्रांताधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर यावल भागातील शेतकरी हा आधीच दुष्काळाने त्रस्त झालेला आहे. त्यातच यावर्षी पावसाच्या अतिवृष्टीमुळे सर्व पिके नाहीशी झालेली आहे. ज्वारी, मका कापणीला आली होती तर कापूस वेचणीवर आला होता. शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. यामुळे आज शेतकरी फारच आर्थिक अडचणीत आलेला आहे. सततच्या नापिकी दुष्काळ, अतिवृष्टी, चक्रीवादळ, गारपीट यासह अनेक कारणांनी शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली दाबला गेला असल्याने पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकºयांना शासनाकडून तत्काळ दुष्काळी मदत मिळावी व शेतकºयांच्या हिताचा योग्य निर्णय सरकारने घ्यावी. यावेळी शेतकºयांनी त्यांच्या भावना मांडल्या.यावेळी माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, रावेर काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, जिल्हा परिषद सदस्य सुरेखा पाटील, यावल पंचायात समिती काँग्रेस गटनेते शेखर पाटील, फैजपूरचे प्रभारी नगराध्यक्ष रशीद तडवी, नगरसेवक कलीम मण्यार, देवेंद्र बेंडाळे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, डॉ.सुरेश पाटील, प्रल्हाद बोंडे, किशोर पाटील, बापू पाटील, योगेश भंगाळे, रमेश महाजन, लीलाधर चौधरी, केतन किरंगे, फैजपूर काँग्रेस शहराध्यक्ष रियाज मेंबर, शेख जफर, सुनील कोंडे, डॉ.गणेश चौधरी, रामा चौधरी, डॉ.राजेंद्र पाटील, गोंडू महाजन, माजी नगरसेविका नीलिमा किरंगे, प्रभात चौधरी, अजित पाटील, संजीव चौधरी, भागवत पाचपोळ, कदीर अशोक भालेराव, रामराव मोरे यासह काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फैजपूर येथे नुकसानभरपाई व सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:23 IST
सर्वच पिके अति पावसाने नष्ट झालेली आहे. पंचनामे करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई, सरसकट कर्जमाफी व एकरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी या मागण्यांसाठी शुक्रवारी फैजपूर येथील प्रांत कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला.
फैजपूर येथे नुकसानभरपाई व सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा
ठळक मुद्देशेतकऱ्यांसह काँग्रेस व राष्टÑवादीचे कार्यकर्ते मोर्चात सहभागीसुभाष चौक ते प्रांत कार्यालय असा निघाला मोर्चाप्रांताधिकाºयांना दिले निवेदन