शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

जामनेरला शासकीय मका खरेदीसाठी प्रशासन व संघाकडून शेतकऱ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 16:43 IST

जलसंपदा मंत्र्यांच्या हस्ते मका खरेदीचा शुभारंभ, मात्र त्यानंतर एकाही शेतकऱ्याकडून मका खरेदी नाही

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी संघाचे व्हाइस चेअरमन बाबुराव गवळी, बाजार समितीचे उपसभापती दीपक चव्हाण , गोडावून किपर सोनवणे व संघाचे कर्मचारी यांच्याजवळ संताप व्यक्त केला.बाजार समितीत सध्या मोजणीसाठी चार शेतकºयांचा सुमारे १ हजार क्विंटल मका उघड्यावर पडून आहे. शेतकºयांना देखील थंडीत थांबावे लागत आहे.

आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.२८ : शासकीय मका खरेदी केंद्रावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी शुभारंभ केल्यानंतर एकाही शेतकऱ्याचा मका पूर्णपणे मोजला गेलेला नाही. पणन महासंघ ग्रेडर देत नाही, शासन मोजलेला मका स्विकारत नसल्याने खरेदी ठप्प झाली आहे. मका विक्रीसाठी आणलेले शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.गेल्या २० नोव्हेंबरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते मका खरेदीचा शुभारंभ झाला. आठ दिवसात फक्त चार शेतकऱ्यांना मका घेऊन येण्याचे सांगण्यात आले. यापैकी एकाही शेतकऱ्यांची मक्याची पूर्णपणे मोजणी झालेली नाही. मक्याची आर्द्रता मोजल्यानंतर १४ पेक्षा जास्त असल्यास तो बाजुला ठेवला जातो. आर्द्रता कमी करण्यासाठी बाजार समितीच्या आवारात सुकवून आणल्यानंतर देखील ग्रेडींग करण्यासाठी पणन महासंघाचा ग्रेडर येत नसल्याने खरेदी बंद पडली आहे.शेतकरी संघाने शुभारंभानंतर आठ दिवसात मोजणी केलेला २३९ क्विंटल मका स्विकारायला शासनाचे प्रतिनिधी तयार नसल्याने व ग्रेडर येत नसल्याने मोजणी बंद ठेवल्याची माहिती केंद्रावरील उपस्थित संघाच्या कर्मचाऱ्याने दिली.दरम्यान, पणन महासंघात संपर्क साधला असता या कार्यालयातील पाटील यांनी सांगितले की, शेतकरी संघानेच मक्याची आर्द्रता तपासून ग्रेडींग करावी असे कळविण्यात आले आहे. शासनाच्या आदेशात देखील तसे म्हटले आहे. गेल्या मंगळवारपासुन २५० क्विंटल मका घेऊन केंद्रावर थांबून आहेत. मोजणी होत नसल्याने त्रस्त झालो आहोत. मक्याची आर्द्रता नियमापेक्षा कमी आहे. केवळ ग्रेडर नाही व शासनाच्या आडमुठे धोरणामुळे शेतकऱ्यांना त्रास सोसावा लागत आहे. व्यापारी कमी भावाने खरेदी करीत असल्याने नुकसान होते, तर शासन हमी भावाने खरेदी करण्याचे सांगत असले तरी केंद्रावर मात्र अडवणूक सुरुच आहे. त्रुटी दूर करुन तातडीने मोजणी केली जावी.- देवानंद सरताळे, शेतकरी, वाघारी, ता. जामनेर.खरेदी केंद्रावर आलेला मका मोजणे हे काम शेतकरी संघाचे आहे. ग्रेडर नियुक्त करण्याचे काम पणन विभागाचे आहे. याबाबत त्यांचेशी पत्रव्यवहार केलेला आहे. शेतकऱ्यांनी आणलेला मका चांगला आहे. मात्र प्रशासकीय अडचणीमुळे मोजणी करु शकत नाही याचे दु:ख वाटते.-चंद्रकांत बाविस्कर, चेअरमन, शेतकरी संघ, जामनेर. 

टॅग्स :JamnerजामनेरFarmerशेतकरी