शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मालाला पुरेसा भाव मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:39 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयाच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी बांधवांची व्यथाकृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेण्यास नकार

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकºयाच्या शेतमालाला पुरेसा भाव मिळत नसल्याची तक्रार शेतकरी बांधवांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडे केली आहे.सूत्रांनुसार, खडके खुर्दचे शेतकरी विलास गुलाब पाटील हे सफेद ज्वारी घेऊन बाजार समितीत गेले. त्यांच्या मालाचा लिलाव करण्यासाठी कोणीही व्यापारी यायला तयार होत नव्हते. संबधित शेतकºयाने विनंती करूनदेखील ते माल घेण्यासाठी तयार होत नव्हते. तेव्हा शेतकºयाने बाजार समितीच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांनी कासोदा येथील व्यवस्थापकाला फोन केला. तेव्हा व्यापारी जयप्रकाश समदाणी आले. परंतु त्यांनी माझ्याकडे माणसं नाहीत व माल ठेवायला जागा नाही, अशी उत्तरे देऊन माल घेण्यास नकार दिला. त्यानंतर दिलीप मंत्री यांनी सफेद ज्वारी घेण्यास नकार देऊन ज्वारी काळी असती तर घेतली असते, असे सांगून शेतकºयाच्या मालाची खिल्ली उडवली. काळ्या ज्वारीला मार्केट आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले. म्हणजे पावसाचा फटका बसलेली काळी ज्वारी त्यांना कमी भावाने मिळते व नफा जास्त मिळतो म्हणून काळी ज्वारीला पसंती दिली जाते व चांगला शेतकऱ्यांचा माल नाकारला जातो, असे सर्वच मालाच्या बाबतीत घडत असते. अशा अनेक वेळा तक्रारी करूनदेखील कासोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव, संचालक यांनाही व्यापारी दाद देत नाही. याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी शेतकरी बांधवांची व्यथा आहे.आम्ही १४०० ते १५०० रुपये प्रति क्विंटल दराने ज्वारी खरेदी करतो. एका व्यापाºयाने १६०० रुपये भाव देऊ केला होता. मालाला उठाव नाही. त्यामुळे जास्त भाव देऊ शकत नाही.-शैलेश मंत्री, व्यापारी, कासोदा, ता.एरंडोलकासोदा बाजार समितीत शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. तेथील कर्मचाºयांना हटवून याबाबत शिस्त लावणे, लिलाव प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी, यासाठी त्वरित लक्ष देऊ.-सुनील पवार, अध्यक्ष बाजार समिती, धरणगाव.

टॅग्स :MarketबाजारErandolएरंडोल