शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही नवीन आर्थिक वर्षात मिळणार लाभ - शरद पवार यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:13 IST

कर्जमाफीसाठी समिती करतेय सखोल अभ्यास

जळगाव : शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. या पूर्वीच्या योजनेत जे शेतकरी यापासून वंचित राहिले आहे, त्यांनाही याचा लाभ मिळावा यासाठी दोन ते तीन सदस्यांची समिती नियुक्त केल्याची माहिती आहे. ही समिती खोलात जाऊन चौकशी करीत असून नवीन आर्थिक वर्षापासून सर्वच शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकेल, असे संकेत माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात दिले.जैन इरिगेशच्यावतीने आयोजित डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्च-तंत्र पुरस्काराचे वितरण सोहळा, मुक्ताईनगर येथे शेतकरी मेळावा तसेच चोपडा येथे चोपडा सुतगिरणीच्या प्रकल्पाच्यो उद्घाटनानिमित्त शरद पवार हे दोन दिवसांच्या जळगाव दौºयावर आले होते. या दौºयात रविवारी सकाळी पवार यांनी घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पवार यांनी शेतकरी कर्जमाफी, कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास, राज्य सरकार न टिकण्याचे भाजपकडून होणारे व्यक्तव्य, दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल अशा विविध विषयांसह पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर आदी उपस्थित होते.वंचित शेतकºयांच्याही आशा पल्लवितराज्य सरकारने दोन लाखापर्यंत शेतकºयांना कर्जमाफी दिली. मात्र फडणवीस सरकारच्या काळातील दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफी योजनेतून अनेक शेतकरी वंचित असल्याच्या मुद्यावर पवार यांनी अगोदर स्पष्ट केले की, या बाबत राज्य सरकार निर्णय घेऊ शकते. मात्र पक्ष पातळीवरील माहितीनुसार ८६ टक्के शेतकºयांना आता कर्जमाफीचा लाभ झाला आहे. योजनेंतर्गत मंजूर रकमेच्यावरील रक्कम भरता न आल्याने केवळ १४ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वचिंत राहिले असल्याचे पवार म्हणाले. त्यासाठी त्याचा अभ्यास करण्यात येणार असून त्यासाठी दोन ते तीन सदस्यांची समिती मंत्रिमंडळाने नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे. ही समिती याच्या खोलात जाऊन चौकशी करणार असूून नवीन आर्थिक वर्षात कर्जमाफी योजनेचा लाभ वंचित शेतकºयांनाही मिळू शकेल असे सांगत जास्तीत जास्त शेतकºयांना फायदा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही पवार म्हणाले. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित शेतकºयांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात जवळपास असे २० हजार शेतकरी योजनेपासून वंचित राहिले असून त्यांनाही नवीन वर्षात लाभ मिळण्याचे संकेत यातून मिळत आहे.एल्गार परिषद प्रकरणांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावीकोरेगाव-भीमा आणि पुण्यातील एल्गार परिषद ही दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत. मी ती बारकाईने तपासली आहेत. एल्गार परिषदेत काही कवींनी भीमा-कोरेगाव प्रकरणावर कविता सादर केली. त्याचा आशय म्हणजे ‘बघ्याची भूमिका घेणाºयांना आग लावू’ असा होता. ही एक प्रकारे चिथावणी असल्याने त्यांना अटक झाली व संबंधितांनी देशद्राही ठरविले. कवितेतून व्यक्त होणें देशद्रोह कसा होऊ शकतो, याच्या विरुद्ध मी भांडत आहे. पोलिसांनी या प्रकरणात केलेली कारवाई संशयास्पद आहे, त्याची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत झाली पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना तसेच गृहमंत्र्यांना पत्रही दिले आहे. त्यात जर खरच कोणी दोषी आढळले तर माझी हरकत नाही मात्र चौकशी व्हायला हवी, ही मागणी आपली असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.‘एल्गार परिषदे’चे सत्य दडपण्यासाठी केंद्र सरकारचा हस्तक्षेप,या प्रकरणाचा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणातील पोलीस अधिकाºयांसोबत बैठक घेऊन काही बाबींची विचारणा केली. त्यात कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे केंद्र सरकारच्या लक्षात आले. म्हणूनच सकाळी बैठक झाल्यानंतर दुपारी ४ वाजता लगेच केंद्राने या प्रकरणाचा तपास राज्याकडून काढून घेत राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला. हे प्रकरण भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झाले असल्याने यातील सत्य दडपण्यासाठी राज्य सरकारकडून याचा तपास काढून घेण्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.राज्याची सहमती न घेता काढला तपासघटनेने कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत तपास करण्याचा अधिकार राज्याला दिला आहे. एखाद्या प्रकरणात चौकशीचा केंद्र सरकारलाही तसा अधिकार आहे. मात्र कोणत्याही प्रकरणात राज्याकडून तपास काढून घेताना राज्याची सहमती घेणे आवश्यक आहे. मात्र या प्रकरणात केंद्र सरकारने तशी सहमती घेतली नाही, हे चुकीचे आहे असेही स्पष्ट मत पवार मांडले.

टॅग्स :Jalgaonजळगाव