शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

तोंडापूरला बिबट्यांच्या संचाराने शेतकरी भयभित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:46 IST

तोंडापूर लगतच्या जंगलात मोठी वृक्षतोड झाल्याने वन्यप्राण्यांचा गावाजवळ संंचार वाढला असून त्यात दोन बिबटे शेतांमध्ये दिसल्याने शेतकरी भयभित झाले आहेत.

ठळक मुद्देवनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणीशेतात कामास येण्यास कोणीही तयार नाही

तोंडापूर ता.जामनेर : येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून शेतशिवारात चक्क दोन बिबट्यांचा रोजच वावर आढळून येत असल्याने शेतकरी भयभित झाले आहेत. वनविभागाने या बिबट्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.तोंडापूर जवळील डोंगराच्या भागात जंगलतोड झाल्याने बिबट्या, निलगाय, रानडुकरे या सारखे वन्यप्राण्यांनी गावाकडे धाव घेणे सुरू केल्याने शेतात वास्तव्याला असलेल्या शेतकऱ्यांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाबाबत अजिंठा येथील वनविभागाला कळविले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.तोंडापूर येथील कासम शाह नजीम शाह यांच्या गट नंबर २६ मधील राक्षा शिवारात बिबट्या बैलावर धावून आला होता. तर एका बिबट्याने एका शेतकºयाच्या बकरीवर हल्ला चढवून तिला ठार मारले, त्यामुळे शेतकरी आणि रहिवाशांमध्ये भिती निर्माण झाली आहे.सहा वर्षापूर्वी याच राक्षा शिवारात बिबट्याने शेतात कपाशी वेचणाºया एका अठरा वर्षीय मुलीवर हल्ला चढवून तिला जबर जखमी केले होते. तर एका मुलाला जीव गमवावा लागला होता. वन विभागाच्या सहा वर्षापूर्वीच्या माहीतीनुसार या परिसरात एकूण अकरा बिबट्यांचा संचार होता. त्या पैकी दोन बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. तर तीन महिन्यांपूर्वी एक बिबट्या शेतात मृतावस्थेत सापडला होता. आता मात्र आठ बिबट्यांचा मुक्तपणे संचार सुरु असून दोन बिबटे शेतकºयांच्या नजरेस पडले आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी किंवा त्यांना पकडून इतरत्र पाठविण्यासाठी वनविभागाने तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.बिबट्याच्या भितीने शेतीत कोणी येईनाया परिसरात सध्यस्थीतीत दोन बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकºयांनी सांगितले. शेतात कपाशी वेचणीवर आली असतांना बिबट्याच्या भितीने कोणीही कामावर येण्यास तयार होत नसल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या