शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या करतोय, कंपनी विषयी नाही,भावावर बोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 13:19 IST

पाशा पटेल यांना सुनावले शेतकऱ्याने खडे बोल

ठळक मुद्देअहो शेतकºयाची बायको चांगली साडे नेसू शकत नाही

जळगाव : तुम्ही, बड्या कंपन्यांचा विषय करता त्या शेतकºयांना लुबाडतात. शेतकºयांच्या गट कंपन्या स्थापन करण्यापूर्वी हमी भावाचे बोला, कापसाचे भाव का वाढले नाहीत... शेतकºयावर आतमहत्येची वेळ का येते? कापूस प्रश्नावरून उपोषणास करणारे मंत्री महाजन यांची सध्याची भूमिका काय? असे खडे बोल डिगंबर बडगुजर (चिंचोली ता.यावल) या शेतकºयाने राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना बुधवारी सुनावले.जिल्हा कृषि विभागातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी कापूस उत्पादक शेतकरी व जिनिंग कंपनी प्रतिनिधींची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात पटेल यांची उपस्थिती होती. कापूस उत्पादक शेतकºयांनी टेबल वाजवून शेतकºयाच्या या भूमिकेला दाद दिली. अचानक झालेल्या शाब्दीक माराने पटेल हेदेखील अवाक झाले होते.पाशा पटेल यांनी मनोगत व्यक्त केले व कापूस क्षेत्रात ज्यांनी वेगळे उपक्रम राबविले अशांनी बोलावे अशी सूचना केली. त्यानंतर ही ठिणगी पडली. शेतकरी डिगंबर बडगुजर हे म्हणाले, तुम्ही एसीत बसतात व भाषणे करतात. अगोदर भाव का मिळत नाही यावर बोला... असे सुनावले. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह तुम्हाला आणि शासकीय अधिकाºयांनाही वाटते की शेतकºयांचे भले व्हावे. मग आज शेतकºयांच्याच विषयावर बोला. शेतकरी ५० क्विंटल कापूस पिकवतो असे सांगता तरीही त्याच्यावर आत्महत्येची वेळ का येते? शेतमालाला जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, यासंदर्भात तुम्ही बोला असे ते वारंवार सांगात होते. यावेळी पटेल यांनी विषयांतर करु नका... मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. अशी विनवणी करीत हा विषय इथेच संपविण्याची सूचना केली. त्यावर शेतकरी बडगुजर हे शांत झाले. यानंतर ही बैठक दोन तास चालली.अहो शेतकºयाची बायको चांगली साडे नेसू शकत नाहीकपाशी उत्पादक शेतकरी किशोर चौधरी (असोदा) यावेळी म्हणाले, आम्ही पिढीजात कापूस उत्पादक आहोत. शेतीत आमचे रक्त सांडले पण नव तंत्रज्ञान मिळाले नाही. गरीब ते गरीबच राहिलो. अहो शेतकºयाची बायको कधी चांगली साडी नेसू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करूनही नव तंत्रज्ञान मिळाले नाही. यासाठी काही तरी करा, मुक्ताईनगर येथील शेषराव पाटील हेदेखील तक्रार मांडण्यास उभे राहीले असता त्यांना बसण्यास सांगण्यात आले. बोदवड येथील निलेश पाटील यांनी कापूस संशोधन केंद्र (नागपूर) कडे काही विषय घेऊन गेले असता साधा प्रतिसाद मिळाला नाही. पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांकडे जास्त लक्ष दिले जाते अशी तक्रारही त्यांनी केली. पाळधी येथील जिनिंग व्यावसायिक सोमाणी यांनी एकरी उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान शेतकºयांना दिले जावे असे मत मांडले. तर शेवगे बुद्रुक ता. पारोळा येथील हरिश्चंद्र पाटील यांनी गट शेतीतील कपाशी न्युयार्कला आम्ही निर्यात करतो असे सांगितले.जळगाव तालुक्यातील करंज येथील शेतकरी यांनी एक गाव एक वाण ही भूमिका राबवून चांगले उत्पन्न मिळवतो असे सांगितले.शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करापाशा पटेल म्हणाले की, एकट्या शेतकºयाला मुबलक प्रमाणात चांगले उत्पादन घेणे शक्य नसल्याने मोठया प्रमाणात सामुहिक शेती, गटशेती करण्यावर भर देण्यात येत आहे. या कार्यशाळेला आमदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, जि.प. उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी शास्त्रज्ञ डॉ.बी.डी. जडे, उपविभागीय कृषी अधिकारी गोरक्ष लोखंडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी आदी उपस्थित होते.आत्महत्या स्लॅबच्या घरात रहाणारा शेतकरीच करतोआपण केंद्राच्या सूचनेवरून शेतकºयाने आत्महत्या केलेल्या काही गावांना भेटी दिल्याचे पाशा पटेल म्हणाले. ज्या शेतकºयांच्या घरावर स्लॅबचे छत होते तेथेच भिंतीवर मयत शेतकºयाचा फोटो दिसला. एकाही झोपडीतील शेतकºयाने आत्महत्या केली असे आढळले नाही. याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, कापूस इतरांकडून घेऊन तो विक्रीस काही जण नेतात मात्र भाव न मिळाल्याने नंतर मनस्ताप होऊन तो आत्महत्या करतो असेही प्रकार आढळून आले. मात्र अशी वेळ त्यांच्यावर येऊ नये यासाठी आपण आज येथे चर्चा करणार आहोत.मी सरकारमध्ये बसून सोल्यूशन देतोय... माझा शेतकºयांप्रती असलेला कळवळा कमी झालेला नाही. विरोधी पक्षात असताना आरोप करावा लागतो. तर सरकारमध्ये आल्यावर सोल्यूशन द्यावे लागते. मी आता सरकारमध्ये बसून सोल्यूशन देण्याचे काम करत आहे. संघर्षाचे रुपांतर आता सोल्यूशनमध्ये झाले आहे. माझी शेतकºयांविषयी असलेली भावना पूवीर्चीच आहे आणि मरेपर्यंत तीच राहील, असेही पाशा पटेल म्हणाले.ं