पारोळा : तालुक्यातील सुमठाणे येथे पती-पत्नी शेतात काम करीत असताना त्यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील सुमठाणे येथे १४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास रवींद्र साहेबराव पाटील व त्यांच्या पत्नी त्यांच्या शेतात काम करत होते. दरम्यान, गावातील नगराज आनंदा पाटील, सोपान नागराज पाटील, पांडुरंग नागराज पाटील, सुमनबाई नागराज पाटील, संदीप राजेंद्र पाटील, कल्पना राजेंद्र पाटील, देविदास मधुकर पाटील, रोहिदास मधुकर पाटील, छोटू चिंधा पाटील, बंडू नानाभाऊ पाटील, खंडू नानाभाऊ पाटील, सुरेखाबाई खंडू पाटील, दामू धर्मा पाटील, रामलाल श्रीराम पाटील यांनी रवींद्र पाटील व त्यांच्या पत्नीस विनाकारण शेतात घुसून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली व जखमी केले. याबाबत न्यायालयाकडून पारोळा पोलिसात २६ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा तालुक्यात शेतकरी दाम्पत्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:54 IST