शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

प्रसिद्ध पुरुष ‘हवेत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 4:09 PM

लोकमतच्या वीकेण्ड सदरात प्रा.अनिल सोनार यांचे हसु भाषिते सदर

त्या देहूच्या तुकाराम वाण्याने सांगून ठेवलंय, ‘प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे.’ तर चाफळ खोºयातल्या ठोसरांच्या नारायणाने बजावलंय, ‘यत्न तो देव जाणावा.’ बहुधा, परमेश्वराची पूर्वसंमती न घेताच कोणी तरी स्वानुभव घोषित करून टाकलाय की, ‘प्रयत्नांती परमेश्वर’ अशा वचनांचा परिणाम म्हणून की काय, काही माणसांनी, अंगात कोणतंही कर्तृत्व नसताना, स्वप्रसिद्धीच्या प्रयत्नांना स्वतला वाहून घेतलेलं असतं. एकदा का ते ह्या प्रयत्नांत यशस्वी झाले की आजन्म ते त्या प्रसिद्धीच्या हवेतच तरंगत असतात. मग स्वत:च्या नावापुढे स्वत:च श्रेष्ठ कवी, सुप्रसिद्ध साहित्यिक, जगप्रसिद्ध माजी संमेलनाध्यक्ष (एक तासीय विश्व साहित्य संमेलन मौजे टेंभुर्णी) इत्यादी बिरुदावली लावून समाधान पावत असतात. आपण चेष्टेचा विषय झालेलो आहोत, हे त्याच्या ‘कानी’ही नसते. कारण-हवेत तरंगणारेऐकण्याच्या मन:स्थितीत असत नाहीत,म्हणूनच तर विमानांना कधीकुणीही भोंगे लावत नाहीत.ह्याचं असं घडतं कारण -काही माणसं जन्मजातछान सुप्रसिद्ध असतात,सुप्रसिद्ध असण्याबाबततर स्वयंसिद्ध असतात.आईला ‘कळा’ येण्याआधीहेच बातमी पाठवतातहे जन्मल्याची बातमी येतेनंतर हे जन्माला येतात.स्वत:चं असं काही नसतानाहे बिनचूक सर्वकाही असतात,कोणत्याही कार्यात नसले तरीबातमीत मात्र सतत असतात.कर्तृत्वाच्या बळावरतीगुणवान माणसं मोठी होतात,बातम्यांचा पाऊस पाडत हेप्रसिद्धीतून मोठे होतात.प्रसिद्धीतून मोठे होणेवाटते तितके सोपे नसते,त्यासाठी अंगामध्येकोडगेपण आवश्यक असते.घरातून हाकलल्यासारखेसभास्थळीच असावे लागते,लेखन डिसेंट्री लागल्यासारखेसतत ‘पेपरात’ रहावे लागते.असा माणूस रोज सकाळीपेपरावर स्वत:ला बघतो,प्रयत्नपूर्वक बालपणीचीसवय निष्ठेने जपतो.सतत दृष्टीस पडत राहूनसुपरिचितही होतो,सुपरिचित हा उद्याचासुप्रसिद्धही असतो.सुप्रसिद्ध झाल्यावर माणूसआपोआप मान्यवर होतो,वयाने ज्येष्ठ असला तर मगकसलाच वांदा नसतो.‘ ज्येष्ठ’त्वापाशी ‘श्रेष्ठ’त्व हेअनुप्रासातून धाऊन येते,अशा रितीने सिद्धीशिवायप्रसिद्धी फळास येते.अर्थात, प्रसिद्धीच्या हवेत तरंगण्यात यास्त्ती होणं हे येरा-गबाळ्याचे काम नोहे. त्यासाठी मेंदूत पशूसंमेलन जागृत ठेवावे लागते. प्रसंगी लांडग्यासारखे लबाड, कोल्ह्यासारखं लालची, सापासारखं कणाहीन, वटवाघळासारखंं मुत्सद्दी, कुत्र्यासारखं लाचार, गाढवासारखं मद्दड, तर मांजरीसारखं निर्लज्जही होता यावं लागतं. तात्पर्य काय की-ओढता येतात पाण्यावर रेघा,बांधता येतात किल्ले हवेत,‘ येन केन प्रकारेणप्रसिद्ध पुरुष ‘हवेत.’