शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पॅनलला मतदान केले नाही म्हणून कुटुंबाला जाती बाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:24 IST

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनलला मतदान केले नाही म्हणून एका कुटुंबाला जात पंचायतीच्या बाहेर काढल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे.

जळगाव - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनलला मतदान केले नाही म्हणून एका कुटुंबाला जात पंचायतीच्या बाहेर काढल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. या घटनेमुळे तळवाडे येथील सरपंचसह 17 जणांवर जातपंचायतीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तळवाडे येथील शरद उखा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की 25 मार्च 2019 रोजी तळवाडे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तेव्हा मी रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलला मदत न करता युवराज फकीरा पाटील यांच्या पॅनलला मदत केली म्हणून माझेच नातेवाईक असलेले कौतिक तोताराम पाटील , सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील , मनोहर श्रीराम पाटील , नाना श्रीराम पाटील , राजेंद्र विठ्ठल पाटील , श्रीराम महिपत पाटील , समाधान नाना पाटील , बापू मोतीराम पाटील , छोटू बापू  पाटील , किशोर नाना पाटील , अशोक श्रीराम पाटील , नंदलाल कौतिक पाटील , मगन रामदास पाटील, सुदाम अभिमन पाटील , लोटन अभिमन पाटील , हिम्मत अभिमन पाटील , शिवाजी अशोक पाटील , नामदेव कौतीक पाटील सर्व रा तळवाडे  यांना राग आल्याने सर्वांनी संमती करून मला जात समूहातून बाहेर काढले व आमच्या व मानवी हक्क व नैसर्गिक तत्वानुसार असलेले सर्व रोटी व बेटी व्यवहार बंद केल्याचा आरोप केला  तसेच सामाजिक व आर्थिक पिळवणूक केली शाळा, सामाजिक कार्यक्रम स्मशानभूमी , धार्मिक कार्यक्रम मिरवणूक आदी ठिकाणी सहभागी होण्यास प्रतिबंध केला आरोपींचे समाजविघातक वर्तन कुटुंबाला जीविताला व सामाजिक राहणीमानाला घातक ठरले आहे  तसेच इतर लोकांकडून व नातेवाईकांकडून बहिष्कार टाकला नुकताच भाऊबंदकीतील 6 मे रोजी झालेल्या विवाहात व 7 मे रोजी अक्षय्य तृतीयेला  शरद पाटील यांना बहिष्कृत केल्याचा अनुभव आला तसेच रामकृष्ण पाटील याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी 17 जंणाविरुद्ध  महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 3, 4, 5 ,6 , 7 प्रमाणे जातपंचायत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Jalgaonजळगाव