शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:31 IST

जळगाव : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’कडे म्हणजेच त्यांच्या संपर्कात आलेल्या ...

जळगाव : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णाच्या ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’कडे म्हणजेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात प्रशासन हतबल ठरत असल्याचे चित्र जळगावात पहायला मिळत आहे. अनेक रुग्णांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या नागरिकांबाबत साधी विचारणाही केली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कोरोनाचा रुग्ण आढळला तर त्याच्या संपर्कात असलेल्या नातेवाईक वा मित्रपरिवार तसेच कार्यालयीन सहकारी यांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी पूर्वी केली जात होती. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने काही कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली होती. मात्र आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेही व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे.प्रशासन एकीकडे वाढती गर्दी, नागरिकांचा बेफिकीरपणा आदी सबब सांगून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला नागरिकांना जबाबदार धरत असले तरीही प्रशासनही अनेक पातळीवर अपयशी ठरत असल्याचेच यामुळे दिसून येत आहे. रुग्ण पॉझिटीव्ह आढळल्यानंतर त्याला त्याच्या घरचा पत्ता, त्याच्या संपर्कातील नातेवाईक, मित्र तसेच अन्य नागरिकांची यादी करवून घेणे गरजेचे असताना ती व्यवस्थित केली जात नसल्याचे चित्र आहे. या रुग्णांवर केवळ उपचारापुरतेच लक्ष दिले जात आहे किंवा त्यांच्या कुटुंबियांची वा शेजाऱ्यांची थर्मल तपासणी केली जाते. यापलिकडे त्यांचा स्वॅब घेणे, आदी नियमांची कार्यवाही होतच नसल्याचे गंभीर चित्र जळगावात दिसत असून काही जागरूक नागरिक मात्र स्वत:हून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतीगृहात रॅपिड अ‍ॅण्टीजन टेस्टसाठी जातात. जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण उपचार घेत असतात, त्या वॉर्डमध्ये नातेवाईक फिरत असतात.समिती आली, गेली..पुढे काय?काही दिवसांपूर्वीच केंद्रीय समितीने जळगावचा दौरा केला, तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील काही नातेवाईकांना रुग्णाची स्थिती, उपचारपध्दती, सेवा याबाबत दूरध्वनीव्दारे विचारणा करण्यात आली होती. यावेळी अनेक रुग्णांनी सेवेतील त्रुटी सांगितल्या होत्या. मात्र अजूनही त्यात काही सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते.कोरोनाच्या गंभीर रुग्णांबाबतीत राहणाºया त्रुटी- रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांचे हायरिस्क, लो रिस्क वर्गीकरण करून त्यांचा स्वॅब घेणे गरजेचे असते. मात्र तसे होताना दिसत नाही.-जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर केसपेपरवर आधारकार्डचाच पत्ता ग्राह्य मानला जातो. अनेकवेळा रुग्णाचा आधारकार्डवरील पत्ता एक तर सध्याचा वास्तव्याचा पत्ता दुसरा असतो. अशावेळी रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर संबंधित घर सील करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आदीकडे लक्षच पुरवले जात नाही. केवळ रुग्णांवर उपचार करण्यापुरतेच आरोग्य यंत्रणा कार्यवाही करते.-सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना भेटण्यासही दिले जात नाही तर दुसरीकडे गंभीर रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईकांना खुलेआम प्रवेश दिला जातो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याचीच शक्यता जास्त राहते.कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील नागरिकांची यादी बनवण्याचे काम नेमून दिलेल्या कर्मचाºयांकडे सोपवण्यात आले आहे आणि ही यंत्रणा शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत कार्यरत आहे. संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे, त्यांचा स्वॅब घेणे, उपचाराकडे लक्ष देणे आदी कामे या यंत्रणेमार्फत केली जातात. यासाठी नेमके किती कर्मचारी नियुक्त करण्यात आले, हे लगेचच सांगता येणार नाही. परंतु, ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळतो, त्या त्या ठिकाणी आरोग्य विभागाची ही यंत्रणा पोहोचतेच.-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव