शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

घटस्थापनेचा मुहूर्त : ६०० दुचाकी व २०० चारचाकींची होणार विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 11:55 IST

एलईडीलाही चांगली मागणी, सुवर्ण बाजारातही दिसणार उत्साह

जळगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून बाजारात वाहन खरेदी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ६०० दुचाकी तर २०० चारचाकींची विक्री होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स बाजारात या वेळी एलईडी, वाशिंग मशिनला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. पितृपक्ष संपताच सुवर्ण बाजारातही खरेदीचा उत्साह दिसून येणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगत आहे.साडेतीन मुहूर्तांसह अनेकजण घटस्थापनेलाही विविध वस्तू खरेदी करतात. त्यानुसार अनेकांनी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंचे बुकिंग केलेले आहे. घटस्थापनेचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी बुकिंग करून ठेवले असून त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मनाजोगे वाहन व वस्तू मिळाव्या म्हणून मोठ्या प्रमाणात बुकिंग केले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.योजनांचा अधिक फायदासण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध कंपन्यांकडून वेगवेगळ््या योजना राबविल्या जात आहे. अर्थसहाय्य तसेच भेटवस्तू देण्यासह एक्सचेंज आॅफरही असल्याने याचाही ग्राहक मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट असून ग्राहकांना फायदा होत आहे.चारचाकींना वाढली मागणीचारचाकींच्या बाजारात मोठी धूम दिसून येत असून घटस्थापनेच्या मुहुर्तावर किमान २०० चारचाकी रस्त्यावर येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शहरातील एका शोरुमध्ये घटस्थापनेसाठी तब्बल १०० चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. इतर शोरुमचे मिळून एकूण २०० चारचाकींची विक्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चारचाकीमध्ये वाहने कमी पडल्यास ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे काही ग्राहकांना विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहन घेता येऊ शकते, अशीही माहिती विक्रेत्यांनी दिली.६०० दुचाकींची विक्रीशहरातील दुचाकीच्या एकाच शोरुमध्ये १२५ दुचाकींचे बुकिंग झाल्याचे सांगण्यात आले. इतर सर्व शोरुमचे मिळून किमान ६०० दुचाकींची विक्री होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये मोपेड गाड्यांना अधिक पसंती असल्याचेही विके्रत्यांनी सांगितले. दुचाकी बुकिंग करण्यासाठी रात्रीपर्यंत दुचाकींच्या दालनात गर्दी होत आहे.इलेक्ट्रॉनिक्स बाजारही गजबजलाइलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठीही बाजार गजबजला आहे. एलईडीला अधिक पसंती दिसून येत आहे. त्या खालोखाल फ्रिज, वाशिंग मशिनला मागणी आहे. या वस्तूंचेच मोठ्या प्रमाणात बुकिंग झालेले आहे.सुवर्ण खरेदीला येणार झळाळीपितृपक्ष पक्ष संपताच सुवर्ण खरेदीला झळाळी येणार असल्याचे संकेत सुवर्ण व्यावसायिकांकडून दिले जात आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोने-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सुवर्ण बाजारात पितृपक्षामुळे खरेदीला पाहिजे तसा प्रतिसाद नव्हता. मात्र पितृपक्ष संपून आता घटस्थापनेला सुवर्णबाजारात पुन्हा रेलचेल दिसणार आहे.घटस्थानेपासून सुवर्ण खरेदीसाठी चांगला उत्साह राहणार आहे. पितृपक्षात खरेदीत पडलेला थोडा खंडही दूर होऊन पितृपक्षापेक्षा आता सोने-चांदीला चांगली मागणी वाढणार आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, शहर सराफ बाजार असोसिएशन.घटस्थापनेच्या मुहूर्तासाठी इलेक्ट्रॉनिक्स् वस्तूंना मागणी वाढणार असून त्यासाठी बुकिंगदेखील करून ठेवण्यात आले आहे. एलईडी, फ्रीज, वाशिंग मशिनला चांगली मागणी आहे.- महेंद्र ललवाणी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेते.घटस्थापनेच्या मुहूर्तावर चारचाकींचे चांगले बुकिंग झालेले आहे. खरेदीसाठी आता ग्राहकांचा उत्साह दिसून येत आहे.-उज्ज्वला खर्चे, व्यवस्थापक.दुचाकी खरेदीसाठी मोठा उत्साह असून घटस्थापनेच्या मुहूर्तासाठी आमच्याकडे गर्दी होत आहे. दालनात दुचाकींच्या बुकिंगसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे.-अमित तिवारी, महाव्यवस्थापक.

टॅग्स :Jalgaonजळगाव