अमळनेर : कोरोना प्रादुर्भाव क्षमल्यानंतर सामान्यांची लाल परी सुसाट धावू लागली असताना, खास रक्षाबंधनानिमित्त अमळनेर आगारातून ज्यादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यात अमळनेर - मुंबई, अमळनेर - पुणे, अमळनेर - नंदुरबार, अमळनेर - सुरत, अमळनेर - शहादा, अमळनेर - औरंगाबाद, तसेच चोपडा, धुळे, जळगाव या सर्व मार्गावर ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. सर्व प्रवासी बंधू आणि भगिनींनी रक्षाबंधनानिमित्त या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक अर्चना भदाणे यांनी केले आहे.
असे आहे जादा बसेसचे नियोजन...
अमळनेर-मुंबई सकाळी ६:३० वाजता, तर मुंबईहून सकाळी ८:३० वा., तसेच अमळनेर-पुणे संगमनेर मार्गे सकाळी ९:३० वा., तर पुण्याहून सकाळी ८ वा., अमळनेर-अर्नाळा ७:३० वाजता, तर अर्नाळाहून ८ वाजता, अमळनेर-सुरत सकाळी ६:३० वाजता, तर सुरत येथून १:३० वा. अमळनेर नंदुरबारमार्गे सुरत सकाळी ६:४५ वा., तर सुरत येथून १५:३०, अमळनेर-नाशिक सकाळी ८:३० वा., तसेच ११ वा., अमळनेर-औरंगाबाद १० वा., औरंगाबाद दुपारी १५ वाजता.