आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२७ : औद्योगिक वसाहतमधील ई-८० या सेक्टरमधील आनंद बॅॅटरी या कंपनीतून बॅटरी बनविण्याचा ३५ हजार रुपये किमतीचा कच्चा माल लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हा माल चोरुन नेतांना तीन चोरटे सीसीटीव्ही कॅम-यात कैद झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लखन वासुदेव बुधानी (वय ४० रा.सिंधी कॉलनी, जळगाव) यांची औद्योगिक वसाहतमधील ई-८० या सेक्टरमधील आनंद बॅॅटरी नावाने कंपनी आहे. प्रमोद पाटील हे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात तर सदाशिव घुले हा वॉचमन आहे. बुधानी हे सोमवारी सकाळी दहा वाजता कंपनीत गेले असता व्यवस्थापक प्रमोद पाटील यांनी बॅटरी बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल सिल्ली सीडचे ४३ नग तयार करुन ठेवले होते, त्यापैकी ८ नग गायब झाल्याचे सांगितले. त्यानुसार कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासले असता कंपनीतून तीन जण हा माल नेतांना दिसून येत आहेत. या तिघांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे वाचमनला विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे नाथानी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. चोरीस गेलेल्या मालाची किंमत ३५ हजार रुपये होती.
जळगाव एमआयडीसीतून बॅटरीच्या कंपनीतून कच्चा माल लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:57 IST
औद्योगिक वसाहतमधील ई-८० या सेक्टरमधील आनंद बॅॅटरी या कंपनीतून बॅटरी बनविण्याचा ३५ हजार रुपये किमतीचा कच्चा माल लांबविण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. हा माल चोरुन नेतांना तीन चोरटे सीसीटीव्ही कॅम-यात कैद झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव एमआयडीसीतून बॅटरीच्या कंपनीतून कच्चा माल लांबविला
ठळक मुद्दे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमे-यात कैदवाचमन असताना झाली चोरी पोलिसात गुन्हा दाखल