शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली ११ लाखांचा गंडा घालणा-या टोळीचा पर्दाफाश

By सागर दुबे | Updated: May 2, 2023 17:37 IST

 टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली जळगावातील डॉ. उल्हास बेंडाळे यांची ११ लाखात ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कोलकाता येथून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जळगाव :  टुर ॲण्ड ट्रॅव्हल्सच्या नावाखाली जळगावातील डॉ. उल्हास बेंडाळे यांची ११ लाखात ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कोलकाता येथून तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याजवळून आठ मोबाईल, तीन संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप आणि आठ एटीएम कार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले असून रिकार्डो क्रिस्टफर गोम्स (३६), प्रियांशू सैवाल बिसवास (२३), अनिकेत अभिजित बिसवास (२४, सर्व रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या सायबर ठगांची नावे आहेत.

डॉ. उल्हास बेंडाळे व त्यांचे दहा सहका-यांना सेव्हर सिस्टर पाहण्यासाठी जायचे होते. त्या अनुषंगाने त्यांनी फेसबुकवर थींकट्रीप ट्रॅव्हल्स या नावाची जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीच्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना संबंधित व्यक्तीने ॲडव्हान्स ३ लाख १५ हजार रूपये तसेच टूर बुक झाली म्हणून ७ लाख २० हजार रूपये आणि आरटीपीसीआर व क्वारंटाईन झाले तर हॉटेल बुक करण्यासाठी ६८ हजार ८०० रूपये असे लागतील सांगण्यात आले. त्यानुसार बेंडाळे यांनी ११ लाख ३ हजार ८०० रूपयांची रक्कम भरली. दरम्यान, काही दिवसांनी त्यांचे बुकींग झालेच नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यांनी १३ मार्च २०२३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.तांत्रिक विश्लेषणानंतर ठगांची मिळाली माहिती

गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी बेंडाळे यांना आलेले कॉल, व्हॉटस्ॲप मेसेज, ज्या बँक खात्यामध्ये पैसे भरले त्यांची माहिती घेवून सायबर ठगांचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे ठग कोलकाता येथे असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोहेकॉ. राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, गौरव पाटील यांचे पथक ठगांच्या शोधार्थ रवाना झाले. रविवारी रिकार्डो क्रिस्टफर गोम्स, प्रियांशू सैवाल बिसवास, अनिकेत अभिजित बिसवास या तिघांना अटक करून पथक जळगावात दाखल झाले. त्यांच्याजवळून मोबाईल, संगणक हार्डडिस्क, लॅपटॉप, एटीएम कार्ड, चेकबुक तसेच एक शिक्का आदी जप्त करण्यात आले आहे.