शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

महामार्ग चौपदरीकरणाच्या कार्यादेशापूर्वीच भूमीपूजनाची घाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 12:58 IST

१९ रोजी भूमीपूजन

जळगाव : राष्टÑीय महामार्ग क्र.५३च्या (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६) च्या शहरातील ८ किमी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे कार्यादेश संबंधित कंपनीला देणे बाकी असतानाही १९ जुलै रोजी या कामाचे भूमीपूजन केले जाणार आहे. कंपनीशी केवळ करार झालेला असताना अपघातांमुळे व शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे नागरिकांमध्ये सध्या निर्माण झालेला रोष शमविण्यासाठी भूमीपूजनाची घाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. या भूमीपूजनासाठी आमदार सुरेश भोळे हे आग्रही असल्याचेही सांगितले जात आहे.शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.६)च्या ८ किमी लांबीचे चौपदरीकरण करणे व ३ चौकांमध्ये व्हेईकल अंडरपास (वाहनांसाठी भुयारी मार्ग) व १ पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग या कामासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार निविदा मिळाल्यानंतर गुडगाव येथील जेसीसी या कंपनीला हे काम हे देण्याचे निश्चित करण्यात आले.केवळ करारनिविदा निश्चित झाल्यानंतर जेसीसी या कंपनीशी केवळ करार झाला आहे. मात्र कंपनीला अद्याप कार्यादेश दिलेले नाही, अशी माहिती ‘नही’च्या अधिकाºयांकडून मिळाली. या कामाचे अद्याप कार्यादेशच दिलेले नसल्याचेही सांगण्यात आले.भूमीपूजनासाठी घाईशहरातून जाणाºया या महामार्गावर दररोज अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या महामार्गासह समांतर रस्त्यासाठी वेगवेगळे आंदोलन झाले. प्रशासनावर अनेकांनी रोषही व्यक्त केला. त्यानंतर या कामांचा कित्येक दिवस डीपीआर तयार झाला नाही, तो झाला तरी निविदांमध्ये बदल झाले. गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे घोळ असताना तसेच शहरवासीयांची नाराजी असताना एवढी तत्परता कधीही दाखविली गेली नाही. आता कार्यादेश नसताना भूमीपूजनासाठी घाई का केली जात आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.१९ रोजी पालकमंत्र्यांच्याहस्ते भूमीपूजनया घाईमध्ये महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमीपूजनाचा मुहूर्तही ठरविण्यात आला असून १९ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. याला ‘नही’च्या अधिकाºयांसह खुद्द आमदार सुरेश भोळे यांनीही दुजोरा दिला आहे.रोष शमविण्याचा प्रयत्नचार दिवसांपूर्वी चित्रा चौकात रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन उद्योजक अनिल बोरोले यांना जीव गमवावा लागला. त्यानंतर दुसºयाच दिवशी महामार्गाच्या खराब साईडपट्ट्यांमुळे पुन्हा अपघात झाला व उज्ज्वल सोनवणे हा तरुण ठार झाला. खराब रस्त्यामुळे हे बळी गेले असल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरवासीयांमध्ये प्रचंड रोष आहे. सोबतच अमृत योजनेमुळे रस्त्यांची मोठी दूरवस्था होण्यासह जागोजागी असलेले खड्डे व पावसामुळे होणारा चिखल हेदेखील विषय दोन अपघातांनंतर ऐरणीवर आले आहेत. या संदर्भात सोशल मीडियावरही वेगवेगळ््या चर्चा होऊन याबाबत मोठा संताप व्यक्त केला जात आहे. शहरवासीयांचा हा वाढता रोष शमविण्यासाठी महामार्ग चौपदरीकरण कामाच्या भूमीपूजनाची घाई केली जात असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव