शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

खळबळजनक..... माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचाही फोन टॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:10 IST

माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी व्यक्त केली

मुक्ताईनगर, जि. जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप झाल्याप्रकरणी चौकशी सुरू असताना भाजपचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोनदेखील टॅप झाल्याचा प्रकार उघडकीस असल्याचा दावा वजा वृत्त दोन इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा प्रकार दुर्दैवी असून, माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया खडसे यांनी नवी दिल्लीतून ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.माजी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांसह विरोधी पक्षनेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याच्या तक्रारी होत्या.या अनुषंगाने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने या प्रकरणात चौकशी कामी उच पदस्थ अधिकाऱ्यांच्या द्वि सदस्य चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करून सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले आहे.फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी सुरू असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालखंडात विरोधी पक्ष नेत्यांसह चक्क स्वपक्षीय नेते व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचेदेखील फोन टॅप केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असे वृत्त इंग्रजी दैनिकात आले आहे.भाजप पक्षातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांची अंदरकी बात बाहेर आली आहे आणि मोठी खळबळ उडाली आहे.फोन टॅप झाले असेल तर दुर्दैवी आहे. हे मी इंग्रजी वृत्तपत्रात वाचले. मला तर तसे वाटत नाही, माझेच काय कोणाचेही फोन टॅप होणे योग्य नाही. नैतिकतेला धरून नाही. असे व्हायला नको पाहिजे होतं. त्यातल्या त्यात मी तर पार्टीचा माणूस आहे. आपल्याच माणसाचे फोन टॅप केले गेले असतील तर दुर्दैवी आहे.-एकनाथराव खडसे, माजी मंत्री

टॅग्स :Jalgaonजळगाव