शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

खडसे यांच्या भाजप सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या वृत्ताने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 19:41 IST

प्रदेशाध्यक्ष व खडसे यांच्याकडून इन्कार : सीमोलंघनासाठी आता गुरुवारचा मुहूर्त

जळगाव : भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने रविवारी राज्यात चांगलीच खळबळ उडाली. या वृत्ताचा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व स्वत: खडसे यांनी इन्कार केला आहे. दुसरीकडे येत्या गुरुवार दि. २२ रोजी खडसे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे.खडसे यांच्या गुरुवारी होणाऱ्या प्रवेशाबाबत राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाºयाने दुजोरा दिला आहे.दरम्यान, प्रवेश सोहळ्याचा संदेश जवळच्या आणि विश्वासू कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. यासाठी मोठ्या संख्येने प्रमुख कार्यकर्ते मुबंई जाण्याच्या तयारीला लागले आहेत.रविवारी दुपारी खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त पसरले आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.याअगोदर खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा होती. ते शनिवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी पक्षांतराबाबत ‘नो कॉमेंटस’ असे उत्तर दिल्याने त्यांच्या सीमोल्लंघनाबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते आता हे सीमोल्लंघन गुरुवारी होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.रावेर येथील चार अल्पवयीन मुलांच्या हत्येची घटना शुक्रवारी घडली होती. या ठिकाणी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेले गृहमंत्री अनिल देशमुख व एकनाथराव खडसे हे एकाच वाहनातून पोहचले होते. दरम्यान या दोघांमध्ये बंद द्वार चर्चाही झाली. यानंतर गुरुवारच्या मुहूर्ताची तारीख जवळपास निश्चित झाली आहे.कोटएकनाथराव खडसे यांच्या पक्ष सदयत्वाच्या राजीनाम्याविषयी मला माहिती नाही. त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही.- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपकागटआपण भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मीडियावालेच मुहूर्त ठरवित आहेत.- एकनाथराव खडसे, भाजप नेते.