शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

दिवाळीच्या खरेदीसाठी उत्साह, सुवर्ण बाजार गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:20 IST

पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी

जळगाव : लक्ष्मीपूजन, चैतन्यमय प्रकाशपर्वाचा रविवारी महत्त्वपूर्ण दिवस. यासाठी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी जळगाव शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. सुवर्ण बाजारही सलग दुसऱ्या दिवशी फुलला होता.गेल्या आठवड्यापासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. शनिवारी महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी तरुणाईसह पुरुष, महिला, लहान मुलांची गर्दी झालेली होती.चोपडी पूजनासाठी खरेदीव्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. यामुळे यासाठी चोपडीदेखील (वह्यांची) शनिवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. लहान आकारापासून मोठ्या आकारातील वह्या, रजिस्टर यांची खरेदी करण्यात आली. २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या वह्यांना मागणी होती.चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले असून दिवाळीला ४००च्यावर चारचाकी वाहनांची विक्री अपेक्षित असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एकाच दालनात २७५ चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. दुचाकींनादेखील मागणी वाढली असून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ६०० दुचाकी विक्री होण्याची अपेक्षा आहे.पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबगबाजारपेठेत थाटलेल्या पूजा साहित्याच्या प्रत्येक दुकानावर गर्दी झालेली होती. केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. लक्ष्मीच्या मूर्ती १०० रुपये ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. या सोबतच लक्ष्मीपूजनात अनन्य महत्त्व असलेल्या केरसुणी २० रुपये ४० रुपये प्रति नग विक्री होत आहे. लहान आकाराच्या केरसुणी १५ रुपयांपासून उपलब्ध आहे. या सोबतच लाह्या ६० रुपये किलो तर बत्तासे १०० ते १२० रुपये किलोने विक्री होत आहे.सुवर्णबाजारात दुसºया दिवशीही गर्दीजळगावातील सुवर्णबाजारात सोने खरेदीसाठी शनिवारी सलग दुसºया दिवशी गर्दी कायम होती. धनत्रयोदशीला शुक्रवारी मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी झाल्यानंतर शनिवारीदेखील सुवर्णपेढ्या गजबजून गेल्या होत्या.झेंडुच्या फुलांना मागणीदिवाळीसाठी शहरात शनिवारी सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणी झेंडुच्या फुलांची दुकाने लागली होती. २० ते ५० रुपये प्रती किलोने झेंडुच्या फुलांची विक्री होत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात फुलांची आवक असल्याने व पावसाचाही फुलांवर परिणाम होत असल्याने त्यांचे भाव चांगलेच गडगडले आहे.कपडे खरेदीसाठी मोठी गर्दीनवीन कपडे खरेदी केले जातात. सध्या कपड्यांची दुकाने विविधरंगी आणि स्पेशल दीपावलीसाठी आलेल्या कपड्यांनी सजली आहेत. लहान मुलांच्या कपड्यांमध्येही विविध व्हरायटीज् उपलब्ध आहेत. त्यातही सुती कपड्यांना जास्त मागणी आहे. कापड घेऊन शिवणकाम करण्यात वेळ जास्त जात असल्याने, शिवाय त्यामध्ये त्रुटी राहण्याच्या भीतीने आजही तयार कपडे घेण्याकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. त्यामुळे रेडिमेड कपड्यांमध्ये विशेष गर्दी दिसत आहे. अनारकली, लेगीज टॉप, पतियाला अशा कपड्यांचा ट्रेण्ड अजूनही आहे. या कपड्यांमध्ये काही नवीन लुक दाखल झाले आहेत. ‘मेन्सवेअर’मध्येही अनेक प्रकार बाजारपेठेत उपलब्ध असून कंपन्यांनीही दीपावलीसाठी आॅफर्स जाहीर केल्याने कंपन्यांचे ड्रेस घेण्याकडे पुरुष ग्राहकांचा कल वाढला आहे.अनेक आॅफर्सदीपावलीनिमित्त एकावर एक मोफत, एक हजार रुपयांच्या किंमतीवर सूट, त्याचप्रमाणे बदलत्या युगाप्रमाणे क्रेडिट, डेबिट कार्डने खरेदी केल्यास १०ते १५ टक्के कॅशबॅकची सुविधाही ग्राहकांना जाहीर करण्यात आली आहे.फराळाचे स्टॉलप्रत्येक दीपावलीला दहा दिवस अगोदरच तयार फराळ तसेच फराळ तयार करून देण्याचे स्टॉल ठिकठिकाणी उभारले जातात. मात्र यंदा निवडणूक मतदानानंतर स्टॉल उभारण्यात आले असून सध्या या स्टॉल्सवर फराळ बनवण्याची लगीनघाई सुरु आहे. रात्रीचा दिवस करून फराळ बनवला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव