शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

जळगावात दिवाळीच्या खरेदीसाठी उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:51 IST

पूजेच्या साहित्यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी

जळगाव : लक्ष्मीपूजन, चैतन्यमय प्रकाशपर्वाचा बुधवारी महत्त्वपूर्ण दिवस. यासाठी लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी जळगाव शहरातील बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. सुवर्ण बाजारही सलग दुसऱ्या दिवशी फुलला होता.गेल्या आठवड्यापासूनच बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी केली जात आहे. मंगळवारी महात्मा गांधी रोड, फुले मार्केट, महात्मा गांधी मार्केट या परिसरात कपड्यांसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी तरुणाईसह पुरुष, महिला, लहान मुलांची गर्दी झालेली होती.चोपडी पूजनासाठी खरेदीव्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. यामुळे यासाठी चोपडीदेखील (वह्यांची) मंगळवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. लहान आकारापासून मोठ्या आकारातील वह्या, रजिस्टर यांची खरेदी करण्यात आली. २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंतच्या वह्यांना मागणी होती.चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बुकिंग करण्यात आले असून दिवाळीला १५०च्यावर चारचाकी वाहनांची विक्री अपेक्षित असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. एकाच दालनात १००चारचाकींचे बुकिंग झालेले आहे. दुचाकींनादेखील मागणी वाढली असून लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ५०० दुचाकी विक्री होण्याची अपेक्षा आहे.पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी लगबगबाजारपेठेत थाटलेल्या पूजा साहित्याच्या प्रत्येक दुकानावर गर्दी झालेली होती. केरसुणी, लक्ष्मीची मूर्ती, लाह्या-बत्तासे यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. लक्ष्मीच्या मूर्ती ६० रुपये ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. या सोबतच लक्ष्मीपूजनात अनन्य महत्त्व असलेल्या केरसुणी २० रुपये ४० रुपये प्रति नग विक्री होत आहे. लहान आकाराच्या केरसुणी १५ रुपयांपासून उपलब्ध आहे. या सोबतच लाह्या ६० रुपये किलो तर बत्तासे १०० ते १२० रुपये किलोने विक्री होत आहे.सुवर्णबाजारात दुसºया दिवशीही गर्दीजळगावातील सुवर्णबाजारात सोने खरेदीसाठी मंगळवारी सलग दुसºया दिवशी गर्दी कायम होती. धनत्रयोदशीला सोमवारी मोठ्या प्रमाणात सुवर्ण खरेदी झाल्यानंतर मंगळवारीदेखील सुवर्णपेढ्या गजबजून गेल्या होत्या.झेंडुच्या फुलांना मागणीदिवाळीसाठी शहरात मंगळवारी सकाळपासूनच मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणी झेंडुच्या फुलांची दुकाने लागली होती. ३० ते ५० रुपये प्रती किलोने झेंडुच्या फुलांची विक्री होत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात फुलांची आवक असल्याचे भाव नियंत्रणात असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.सोने खरेदीसाठी मंगळवारीदेखील गर्दी होती. सुट्या असल्याने बाहेरगावाहून जळगावात आलेले मंडळीदेखील सहकुटुंब सुवर्ण खरेदीसाठी आल्याने मोठी गर्दी झाली होती.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशनधनत्रयोदशीला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आजही सोने खरेदीस चांगली मागणी राहिली. सकाळपासूनच सुवर्णपेढ्यांमध्ये गर्दी झाली होती.- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.चारचाकी वाहनांच्या खरेदीस चांगला प्रतिसाद असून दिवाळीसाठी आमच्या एकाच दालनात ४७ वाहनांची डिलिव्हरी दिली जाणार आहे.- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.लक्ष्मीपूजनाचा मुहूर्तलक्ष्मी पूजन हे अश्विन अमावस्येलाच होते. त्यामुळे अमावस्येच्या पर्वकाळात महालक्ष्मीपूजन कुलपरंपरेनुसार करण्यात येते. त्यासाठी विशिष्ठ मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. अमावस्या हाच पर्वकाल आहे, असे जाणकारांचे म्त असून लक्ष्मीपूजनासाठी विशेष मुहूतार्ची गरज नाही, असे स्पष्ट करण्यात आले.आज सकाळी - ६.२७ ते ७.५३ शुभ, ८.२७ ते १०.४१ वृश्चिक लग्नसकाळी - ६.३८ ते ८.२ पर्यंत लाभ, ८.२ ते ९.२६ पर्यंत अमृत, १०.५१ ते १२.१५ पर्यंत शुभ, दुपारी १.३१ ते ३.६ पर्यंत कुंभलग्न, ३.६ ते ४.२५ चल, दुपारी ४.२५ ते संध्याकाळी ५.५२ लाभ.वृषभ लग्न व गोरज मुहूर्त - सायंकाळी ६ ते ८.२०, सायंकाळी ७.२८ ते रात्री ९.४, शुभ, रात्री ९.४ ते १०.३९ अमृत, मध्यरात्रीनंतर सिंहलग्न.