शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जळगावात मधूर गायन आणि बेधुंद नृत्याने रसिक झाले दंग, बालगंधर्व संगीत महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 12:40 IST

नंदिनी, अंजली आणि अमिरा यांचा कलाविष्कार

ठळक मुद्देपुस्तकाचे  प्रकाशनअमिरा यांच्या कथ्थक नृत्याने रंगत

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 07- बालगंधर्व संगीत महोत्सवात दुस:या दिवशी नंदिनी आणि अंजली गायकवाड यांनी आपल्या मधाळ गायनाने रसिकांना भारावून टाकले तर  अमिरा पाटणकर यांच्या बेधुंद कथ्थक नृत्याने सभागृह दंग झाले.   स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान तर्फे आयोजित येथील कांताई सभागृहात सुरु असलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात रसिकांना सूर आणि ताल यांची सुरेल मेजवानीच मिळत आहे. मान्यवर तसेच पहिल्या सत्रातील कलावंतांचे स्वागत  डॉ. सुभाष चौधरी, युनीयन बँकेचे अधिकारी  एच. के. जेना, जैन इरिगेशनचे संचालक सुनील देशपांडे आदींनी केले. गुरुवंदना जुईली कलभंडे यांनी सादर केली. सूत्रसंचलन दीप्ती भागवत यांनी केले.शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने भारवले श्रोतेपहिल्या सत्रात, अंजली व नंदिनी गायकवाड  या अहमदनगर येथील भनिनींनी मधुवंती रागातील सुिनये नाथ गरीब हा मध्यलयीतील रुपक तालातील बंधीश सादर करुन रसिकांची दाद मळवली. त्यानंतर दृत एक तालात अंबीका जगदंबे भवानथ हा तराना गाऊन रिसकांना मंत्रमुग्ध केले. पाठोपाठ यमन रागात मेरो मन बाधंलियो, हे सादरीकरण विलंबीत एकतालात व तीन तालात गावे गावो मंगल गीत आणि तीन तालात तराणा सादर करुन रिसकांकडुन दाद मिळविली.अमिरा यांच्या कथ्थक नृत्याने रंगतदुस:या सत्रात गुरु शमा भाटे यांचा शिष्या अमिरा पाटणकर (पुणे) यांनी कथ्थक नृत्य सादर केले. झाली. अमिरा यांचे स्वागत चांदोरकर प्रतिष्ठानच्या व्हा. चेअरमन दिपिका चांदोरकर यांनी केले. गायक सुरंजन खंडाळकर यांचे स्वागत प्रतिष्ठानचे सेक्रेटरी अरविंद देशपांडे यांनी केले. संवादिनी वादक अभिषेक शिनकर यांचे स्वागत  एच. के. जेना यांनी केले. तबला वादक चारुदत्त फटके यांचेस्वागत अॅड. सुशील अत्रे यांनी केले. पढंत करणा:या शिल्पा भिडे हिचे स्वागत प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंजुषा भिडे यांनी केले. सुरवातीला तोडी रागातील शिव वंदना सादर केली. त्यानंतर 7 मात्रांतील रुपक तालात कथ्क नृत्य सादर करुन रिसकांची वाहवा मिळवली. ऐसी मोरी रंगी हे शाम, शाम घर आहे ही पिलू रागातील ठुमरी सादर करुन रिसकांना मंत्रमुग्ध केले. सांगता रामायणातील रावणाच्या मनातील अंतरद्वंध्व सादर करुन, बाजे मुरलीया बाजे या भजनाने झाली.तिस:या दिवशी  समारोपाच्या दिवशी 7 रोजी सकाळी 7 वाजता विशेष प्रात: कालीन सत्रात  पंडीत आनंद भाटे (पुणे) यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन महात्मा गांधी उद्यानात होणार आहे. तर सायंकाळी कांताई सभागृहात संस्कृती व प्रकृती वहाने यांची सतार व  संतुर तर  पंडीत कालीनाथ मिश्रा आणि पंडीत सत्यप्रकाश मिश्रा (मुंबई) यांची तबला जुगलबंदी होईल. याचबरोबर दिप्ती बव्रे भागवत (मुंबई) या सुसंवादिनीच्या सुरांची बरसात करणार आहे.वडिलांनी केली साथसंगत अंजली व नंदिनी गायकवाड  यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनादरमयन हार्मोनियमवर  साथसंगत त्यांचे वडील तथा गुरु अंगद गायकवाड यांनी केली. तबल्याची साथ प्रशांत थोरात यांनी तर तानपु:याची साथ मयुर पाटील व अनघा कुलकर्णी यांनी दिली.पुस्तकाचे  प्रकाशनबालगंधर्व संगीत महोत्सवाचे औचित्य साधून प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांचे पुत्र बॅकपॅकर मौक्तीक कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘घोस्ट ऑफ चे’ या इंग्रजी पुस्तकाचा मराठी भावानुवाद ‘मॅडनेस ऑन व्हिल्स’ हा स्व. वसंतराव चांदोरकर यांची कन्या अमृता करकरे यांनी केला असून या भावानुवादाचे प्रकाशन या सर्वाच्या उपस्थितीसह विशेष सरकारी वकील  उज्ज्वल निकम यांच्याहस्ते करण्यात आले. दीपक चांदोरकर, विक्रीकर विभागाचे उपायुक्त दीपक भंडारे यांचीही मुख्य उपस्थिती होती.