शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या बेसुमार उपशाला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:58 IST

कारवाई होत असतानाही धाक नाही, मंगळवारी पाच वाहने जप्त

जळगाव : वाळू ठेके बंद होऊन उपशावर बंदी असतानाही शहर व परिसरात अवैध वाळू वाहतूक सुरूच असून वाळू वाहतूकदारांकडून नदी पात्रातून उपशाला ऊत आला आहे. महसूलचे पथक नदीपात्राकडे जाऊन वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यावर वाळू वाहतूकदारांची नजर असते. त्यामुळे वाळूची वाहने पथकास चकमा देऊन पसार होत असल्याचेही प्रकार सुरू आहे. मुळात खरोखर पथकाकडून कारवाई केली जाते की केवळ सोपस्कार म्हणून पाहणी होत आहे, असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत वाळूचोरी’ या मथळ््याखाली मंगळवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशिक होताच महसूलच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे तीन ट्रँक्टर तर मुरुम वाहतूक करणारे दोन वाहने जप्त केली.वाळू गटांची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही वाळू गटातून वाळूचा उपसा करू शकत नाही. असे असले तरी दररोज मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याचे चित्र आहे. गिरणा नदीपात्रात तर वाळू उपशासाठी वाहनांची जत्राच भरल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे या ठिकाणी वाहनांच्या चाकांचे निशाण मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. त्यामुळे त्यावरूनच उपशाचा अंदाज येतो.आव्हाणे, खेडी, वडनगरी, निमखेडी, सावखेडा, बांभोरी, नागझिरी या भागातून सर्रासपणे वाळू उपसा सुरु आहे. ही वाहतूक रात्रीच्या वेळी तर मोठ्या प्रमाणात होतेच सोबतच आता दिवसाही वाळूची वाहने वाळू भरुन नेत असल्याचे दिसून येते.मंगळवारीदेखील गिरणा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाहने वाळू भरत होती. त्या ठिकाणी वाळू भरून-भरुन नदी पात्र अक्षरश: ओरबडले जात आहे.नागझिरी परिसरात तीन ट्रॅक्टर जप्तमंगळवारी ‘लोकमत’मध्ये ‘जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत वाळूचोरी’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशिक होताच महसूलच्या पथकाने कारवाई केली. यात नागझिरी परिसरात वाळू वाहतूक करणारे तीन ट्रँक्टर मंगळवारी सकाळी जप्त करून ती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आली. मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी सचिन माळी, रवींद्र वंजारी, सुधाकर पाटील यांनी ही कारवाई केली.मुरुमचे दोन वाहने जप्तमंगळवारी दुपारी पुन्हा महसूलच्या पथकाने औद्योगिक वसाहत परिसरात मुरुम वाहतूक करणार एक ट्रॅक्टर व एक डंपर असे दोन वाहने जप्त करून ती जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात लावण्यात आली. मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे, तलाठी सचिन माळी, रवींद्र वंजारी, सुधाकर पाटील यांच्यासह प्रांत कार्यालयातील जगदीश धमाले, पो.कॉ. हितेश महाजन यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव