शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिका-यांसह दोघांकडून उडावउडवीचे उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 13:34 IST

लाच प्रकरण : तीन हजेरीच्या अटीवर तात्पुरता जामीन जळगाव : वाळूचे डंपर सोडण्यासाठी सव्वा लाखाची लाच घेतल्याच्या प्रकरणात अटकेत ...

लाच प्रकरण : तीन हजेरीच्या अटीवर तात्पुरता जामीनजळगाव : वाळूचे डंपर सोडण्यासाठी सव्वा लाखाची लाच घेतल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रांताधिकारी दीपमाला जयपाल चौरे (३६) व लिपिक अतुल अरुण सानप (३२) या दोघांना न्यायालयाने शनिवारी आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवारी असे तीन दिवस दुपारी १२ ते ३ या वेळेत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजेरी लावण्याच्या अटीवर वैयक्तिक जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर केला. दरम्यान, दोघांनी तपासात सहकार्य केलेले नसून उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे तपासाधिकाºयांनी न्यायालयात सांगितले.प्रांताधिकारी चौरे व सानप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अटक केली होती. तपासाधिकारी संजोग बच्छाव यांनी दोघही लाचखोरांना शनिवारी न्या.डी.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केले. चौरे व सानप या दोघांनी पंटर तथा साक्षीदार बाळू चाटे याच्या माध्यमातून सव्वा लाख रुपयांची लाच स्विकारली आहे. या प्रकरणात महसूल विभागातील इतर अधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. तपासात दोघंही जण उडवाउडवीचे उत्तरे देत असून यापूर्वी त्यांनी जप्त केलेली वाहने कारवाई न करता अशाच प्रकारे सोडून दिल्याचा संशय असून त्या वाहनधारकांकडे लाच मागितली आहे का? याची चौकशी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय दोघांची स्थावर, जंगम मालमत्ता तसेच बॅँक खात्याची माहिती घेणे बाकी आहे. महत्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविणे बाकी आहे, त्यामुळे या दोघांची पास दिवसाची पोलीस कोठडी आवश्यक आहे, जामीन झाल्यास ते पुरावा नष्ट करुन साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असेही तपाासधिकाºयांनी न्यायालयात नमूद केले.पंधरा दिवसात कोठडी घेवू शकतात...दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर न्या.देशपांडे यांनी दोघांना वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम (तात्पुरता) जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालयाने तपासासाठी गरज भासल्यास १५ दिवसात पोलीस कोठडी मागता येईल, असेही स्पष्ट केले. तीन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव