शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘ईव्हीएम’चा बैलगाडीने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 23:37 IST

सात्री गावात पुन्हा वाढली पातळी : मूलभूत सुविधांसाठी खडतर प्रवास

अमळनेर : तालुक्यातील सात्री हे गाव बोरी नदीला आलेल्या पुरामुळे दीड महिन्यापूर्वी वेढले गेले. मात्र तेथील ग्रामस्थांचे हाल अद्याप कायम असून रविवारी बैलगाडीने निवडणूक कर्मचारी या गावात पोहचले. मात्र तासाभरात नदीला पूर आल्याने पुन्हा गैरसोय होण्याची शक्यतात आहे.अमळनेर ते सात्री गावाचे अंतर १८ किलोमीटर आहे. येथून मारवड मार्गे डांगरी प्र. गावातून सात्रीला बोरी नदीचे पात्र ओलांडत जावे लागते. पावसाळ््यात पाण्याचा जोर जास्त वाढल्याने या गावातून रुग्णांना लाकडी खाटेवर बसवून ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागत होते.५ सप्टेंबर पासून बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला होता. या गावचे पुनर्वसन होणार असल्याने या गावाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. निवडणूक कर्मचारी एक तास उशिरा गेले असते तर बैलगाडीने सुद्धा पोहचविणे अशक्य झाले असते.सहा वर्षात बोरी नदीला पूर आला नव्हता म्हणून समस्येचा विसर पडला होता. मात्र यंदा जोरदार पावसाने अद्यापही नदी वाहत आहे. त्यामुळे बस गावात जाऊ शकत नाही.पाण्यातून वाट काढत लोक ये-जा करतात. मतदान केंद्रावर कर्मचारी २० रोजी बैलगाडीने पाचले खरे, पण त्यानंतर तासाभराने नदीला पूर आल्याने पुन्हा गैरसोय होण्याची शक्यता बळावली आहे.अवघ्या एक तासात पाण्याची पातळी इतकी वाढली की बैलगाडीने जाणेसुद्धा अवघड झाले आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत पाण्याची पातळी कमी न झाल्यास कर्मचाऱ्यांना खाटेद्वारे किवा बोटीवर आणावे लागेल. काही मतदार इतरत्र स्थलांतरित झाल्याने त्यांना मतदानासाठी असुविधा होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

सात्री येथे दैनंदिन कामकाजासाठी बाहेरगावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी जायचे असल्यास नदीपात्रातूनच जावे लागते. दुष्काळी कालावधी वगळता नदीला पाणी असते. त्यामुळे रात्रीबेरात्री गावाबाहेर जाण्याची वेळ आल्यास ग्रामस्थांची तारांबळ उडते. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पूरस्थितीमध्ये शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागते. अनेक वर्षांपासून पुनर्र्वसन प्रलंबित आहे. त्याबाबत अनिश्चतता असल्याने त्वरित पूल बांधण्यात यावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.