आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२८ : निवडणूक आयोगाने मतदानासाठी गेल्या काही वर्षांपासून मतपत्रिकेचा वापर बंद करीत ईव्हीएम मशीनचा वापर सुरू केला आहे़ मात्र, अनेकवेळा या मशीनमध्ये अनेक त्रुटी असल्याचा आरोप विविध राजकीय पक्षांकडून होत आहे. त्रुटी लक्षात घेता गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ईलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी फिंगर प्रिंट बेस ईव्हीएम मशीनची निर्मिती केली आहे़हा प्रकल्प गणेश राजपूत, गौरव चौधरी, रोहन कुलकर्णी, कुणाल पाटील व सुमित भावसार या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे़ त्यांना प्राचार्य डॉ़ए़जे़पाटील, उपप्राचार्य प्रा़सी़एस़पाटील, विभागप्रमुख प्रा़आऱआऱ कडुहे, प्रा़ ए़एऩ शेवाळे यांचे मार्गदर्शन लाभले़ दरम्यान, प्रकल्पामध्ये ३२ बिट, आर्म ७ प्रोसेसर वापरला असून त्यात अतिरिक्त मेमरी कार्ड स्लॉट उपलब्ध आहे. यामध्ये पाच हजारांपेक्षा अधिक मतदारांची माहिती साठवता येऊ शकते.या यंत्रात जीपीएस व जीएसएम मॉडेल्स वापरले असून त्यामुळे निकाल देखील सेंट्रलाईज पद्धतीने एकाच वेळी जाहीर करता येतो. यामध्ये अजून एक खास बाब आहे. जर एखाद्या केंद्रावर कुणी गोंधळ घातला किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास केंद्र अधिकारी एक विशिष्ट कोड टाकून मुख्यालयावर संदेश पाठवून अतिरिक्त मदत मागवू शकतो़ तो पर्यंत मशीनदेखील तांत्रिक अडचण असा संदेश देत काम करणार नाही़या यंत्रामुळे बोगस मतदानास आळा बसण्यास मदत होणार आहे़ या यंत्रामध्ये आधीच मतदारांचे आधार कार्ड नंबर व फिंगर प्रिंट साठवलेले असतील. जेव्हा अधिकृत मतदार मतदान केद्रांवर जाईल तेव्हा तो फिंगर प्रिंट सेंसर वर बोट ठेवताच त्याचा आधार क्रमांक व नाव त्या डिस्प्लेवर येईल. तेव्हाच ईव्हीएम मशीन कार्यान्वित होईल व त्याचे मतदान नोंदविले जाईल.
बोगस मतदान रोखण्यासाठी जळगावात तयार केली ईव्हीएम प्रणाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 18:50 IST
जळगावातील गुलाबराव देवकर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन
बोगस मतदान रोखण्यासाठी जळगावात तयार केली ईव्हीएम प्रणाली
ठळक मुद्देगोंधळ झाल्यास संदेश पाठवून मागविता येईल मदतया यंत्रामुळे बोगस मतदानास बसणार आळायंत्रामध्ये आधीच मतदारांचे आधार कार्ड नंबर व फिंगर प्रिंट