शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात रोज दुपारनंतर डोळे चुळचुळतात, मळमळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 12:44 IST

दरुगधीमुळे घरात बसणे कठीण : ज्ञानदेव नगर, सागर नगर, श्रीकृष्ण नगरात अबालवृद्धांना प्रचंड त्रास

ठळक मुद्देपरिसरात डेंग्यूचे रूग्ण पैसे द्या तरच साफसफाई करणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17  - कुजलेल्या जनावराप्रमाणे दुपारनंतर हळूहळू वाढत जाणा:या दरुगधीमुळे  घरात बसणे मुश्कील होते. डोळे चुळचुळतात. पाणी येते व मळमळते, अशी कैफियत ज्ञानदेव नगर, योगेश्वर नगर, सागर नगर, श्रीकृष्ण नगर व परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’कडे मांडली. ही समस्या तातडीने सोडवावी यासाठी ज्ञानदेव नगरातील महिलांनी शनिवारी दुपारी रस्त्यावर येऊन निदर्शने केली.शहरातील कालिंका माता परिसर, ज्ञानदेव नगर, सागर नगर, श्रीकृष्ण नगर, सुनंदीनी पार्क, सदाशिव नगर यासह खेडी भागात दरुगधीयुक्त वासाने गेल्या चार दिवसांपासून नागरिक त्रस्त आहेत. नेमका वास कोठून येतो याचा शोध घेण्याच्या प्रय}ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका:यांकडून घेतला जात आहे, मात्र अद्यापही शोध लागलेला नाही. या भागात ‘लोकमत’ चमूने पाहणी करुन अबालवृद्धांच्या व्यथा जाणून घेतल्या. ज्ञानदेव नगरालगतच्या भागात काही लहान मुलांना अस्वच्छता व पाण्याच्या डबक्यांमुळे डेंग्यू झाल्याची तक्रारही नागरिकांनी केली. गटारी तुंबलेल्या असून मोकळया प्लॉटवर गवत वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गटारींवरील गवतामुळे डास   प्रचंड वाढले असून साथीच्या आजाराने नागरिक हैराण आहेत. साफसफाई करणा:यांना पैसे द्यावे लागतात मगच ते गवत  काढतात.महापौर ललित कोल्हे यांनीही या भागात फिरकून पाहिले नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. 

कालिंकामाता परिसरात भेट दिली असता तेथील महिलांनी एकत्र येऊन कैफियत मांडली. दुपारी 3 वाजेनंतर दरुगधीयुक्त वास सुरू होतो. तो सायंकाळर्पयत वाढत जातो. रात्री आठ वाजेच्या दरम्यान या वासामुळे घरात बसणे कठीण होते.डोळे चुळचुळतात, त्यातून पाणी येते. लहान मुलांना या वासामुळे मळमळते व जेवताना ते कोरडय़ा ओका:या देतात. यात वयोवृद्ध तसेच दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तींना जास्त त्रास होतो. त्यांना श्वास घ्यायला कठीण जात असल्याच्या तक्रारी या महिलांनी केल्या. प्रशासनाने यावर तत्काळ मार्ग काढण्याची मागणी रहिवाशांनी केली.