शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

प्रत्येक शिवसैनिक पदास लायक, विधानसभेचा उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील !

By सुनील पाटील | Updated: September 16, 2023 17:38 IST

महापौर जयश्री महाजन : महापालिका सोडताना जयश्री महाजन, कुलभूषण पाटील झाले भावूक

जळगाव : शिवसेनेत प्रत्येक शिवसैनिक पदास लायक असतो, पक्षप्रमुख जो आदेश देतात तो सर्वांना मान्य करण्याची पध्दत आहे. तेच सूत्र आगामी विधानसभेसाठी लागू राहणार आहे. पक्ष प्रमुख ज्यांना उमेदवारी देतील तो आमचा उमेदवार असेल असे सांगून मावळत्या महापौर जयश्री महाजन यांनी पक्षाने आदेश दिला तर विधानसभेची निवडणूक लढवू अशी सुप्त इच्छा शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

महानगरपालिकेची मुदत १७ सप्टेबर रोजी संपत असल्याने शनिवारी महापौर दालनात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक किशोर बाविस्कर, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान उपस्थित होते. अडीच वर्षाच्या कार्यकाळात झालेली विकासकामे, आगामी काळात होऊ घातलेली कामे याबाबत त्यांनी माहिती दिली. महापालिकेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानुसार बांधकाम विभागामार्फत शहरात १०० कोटी व ८५ कोटीचे कामे पावसाळ्यानंतर सुरु होणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत शहरात रस्ते झालेले असतील. एक वेगळं चित्र तेव्हा असेल. महापालिकेत प्रथमच नगरसेवक निधीचा हेड तयार करुन अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी २५ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली.

शरद पवार महाविकास आघाडीचे नेतेमध्यंतरी आपल्या निष्ठेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते आमच्या भागातूनच जाणार असल्याने शहराच्या प्रथम नागरिक या नात्याने त्यांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. ते त्यांनी स्विकारले. आम्ही त्यांचा सत्कार केला. आपल्या घरी कोणीही मोठी व्यक्ती आली तर आनंद होतोच. यात निष्ठेबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही.

मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते अनावरण करावा नियम नाहीराजशिष्टाचारानुसारच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याच हस्ते अनावरण करावे, असा कोणताही नियम नाही. कोणाच्या हस्ते अनावरण करावे याचे पूर्ण अधिकार महापालिकेला आहेत. मनपा ही स्वायत्त संस्था आहे. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील तिन्ही मंत्री व शहराच्या आमदारांना निमंत्रण दिले होते. राजशिष्टाचार पाळला नाही असा आक्षेप घेणे चुकीचे नाही असेही महापौर म्हणाल्या.

टॅग्स :JalgaonजळगावMayorमहापौरShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा