जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील अजिंठा चौफुलीदरम्यान असलेल्या पहूर पाचारो जंक्शनचे काम वीज खांब स्थलांतरामुळे महिनाभरापासून बंद होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने गेल्या महिन्यात ३० जून रोजी ‘विजेचे खांब हटविण्यावरून महामार्गाच्या कामाला ब्रेक,’ असे वृत्त प्रकाशित केले. याची दखल वीज वितरण कंपनीने घेऊन तातडीने शनिवारी वीज खांब हटविण्याची प्रक्रिया सुरू केली.
यावेळी उपकार्यकारी अभियंता व्ही. डी. सोनवणे व लाइनमन उपस्थित होते. महामार्गाचे काम रखडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत ठेवून वाहन चालवावे लागते. वाहतुकीची कोंडी होत आहे. यासंदर्भात वीज वितरण व संबंधित महामार्गाचा कंत्राटदार एकमेकांकडे बोट दाखवून घोंगडे झटकण्याचा प्रयत्न करताना दिसून आले.
पहूर - पाचोरा जंक्शनच्या कामात अडथळा ठरणारे वीज खांब स्थलांतरित करताना लाइनमन. (छाया : मनोज जोशी)
100721\20210710_132918.jpg
पहूर -पाचोरा रस्त्यावरील जंक्शनच्या कामात अडथळा ठरणारे विदूतपोल स्थलांतरित चे कामे करताना लाईन मन व कर्मचारी.