शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

वडिलांचा मृत्यू समोर दिसत असतानाही ‘त्याने’ लिहिला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 14:55 IST

तो पेपरला द्यायला निघाला, तेव्हा त्याच्या डोळ्यात वडिलांच्या आजवरपणाचे अश्रू एकवटले होते. हुंदकाही दाटून येत होता. पेपरहून परतल्यानंतर त्याच्या वडिलांची प्राणज्योत विझली होती. पार्थिवाला खांदा देतानाच पुढचे सर्व पेपर द्यायचे आणि वडिलांना श्रद्धांजली अर्पण करायची. जयेश जिजाबराव बोरसे याच्या धिरोदत्त संकल्पाने अनेकांना आपला हुंदाका आवरता आला नाही. जयेश आ.बं.विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे. मराठीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी त्याचे वडील प्रा.जिजाबराव बोरसे यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देदाटून येई हुंदकाचाळीसगावच्या जयेश बोरसेचा संघर्ष स्ट्राईकउत्तरकार्य पाचव्या दिवशी करण्याचा निर्णय

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : तो पेपरला द्यायला निघाला, तेव्हा त्याच्या डोळ्यात वडिलांच्या आजवरपणाचे अश्रू एकवटले होते. हुंदकाही दाटून येत होता. पेपरहून परतल्यानंतर त्याच्या वडिलांची प्राणज्योत विझली होती. पार्थिवाला खांदा देतानाच पुढचे सर्व पेपर द्यायचे आणि वडिलांना श्रद्धांजली अर्पण करायची. जयेश जिजाबराव बोरसे याच्या धिरोदत्त संकल्पाने अनेकांना आपला हुंदाका आवरता आला नाही. जयेश आ.बं.विद्यालयात इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे. मराठीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी त्याचे वडील प्रा.जिजाबराव बोरसे यांचा मृत्यू झाला.के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालयात प्रा.जिजाबराव बोरसे हे मूळचे चिंचखेडे येथील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. २७ फेब्रुवारीनंतर त्यांचा आजार बळावल्याने दहावीचा अभ्यास करणाऱ्या जयेशचे मन कासाविस व्हायचे. काळजावर दगड ठेवून तो मन अभ्यासात गुंतवायचा.१ रोजी वडिलांची खालावलेली प्रकृती पाहून त्याला कोलमडून पडायला झाले. मात्र स्वत:ला सावरत आणि जणू वडिलांकडे अखेरचा कटाक्ष टाकीत तो मराठीच्या पेपरला गेला. डोळ्यासमोर वडिलांचे मृत्यूशय्येवरील कलेवर असतानाही जयेशने पेपर पूर्ण सोडवला. इकडे घरी मात्र त्याच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला होता. नातेवाईकांनी संयम बाळगून त्याला वडिलांची दु:खद वार्ता कळवली नाही. घरी परल्यानंतर जयेशवर वडिलांच्या पार्थिवालाच खांदा देण्याचे डोंगराएवढे दु:ख कोसळले.उत्तरकार्य आणि इंग्रजीचा पेपरमुलावर आणखी आघात नको म्हणून स्व.जिजाबराव बोरसे यांचे उत्तरकार्य पाचव्या दिवशी उरकण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मंगळवारी सकाळी जयेशने सर्व विधी पार पाडले. यानंतर तो इंग्रजी विषयाच्या पेपरला सामोरे गेला.आईची किडनी अन् मृत्यूचा पाठलागस्व.जिजाबराव बोरसे यांचे चौकोनी कुटुंब. अगदी हम दो, हमारे दो... असे. चार वर्षांपूर्वी ते आजारी पडले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या जिजाबराव यांना त्यांची आई लीलाबाई यांनी पुन्हा एकदा जीवदान दिले. आपली किडनी त्यांनी मुलासाठी दिली. गेली चार वर्षे त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र चार वर्षांनंंतर पुन्हा मृत्यूने त्यांचा सुरू केलेला पाठलाग १ मार्च रोजी पूर्ण केला. त्यांची मोठी मुलगी तेजल चाळीसगाव महाविद्यालयात शेवटच्या वर्षात असून जयेश यंदा दहावीची परीक्षा देत आहे.जड अंत:करणाने पहिला पेपर लिहिला. घरी आल्यावर वडिलांचा मृतदेह पाहून उन्मळून पडलो. मंगळवारी उत्तरकार्याचे सर्व विधी उरकले. दहावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.- जयेश बोरसेइयत्ता दहावी, आ.बं.विद्यालय, चाळीसगाव, जि.जळगाव

टॅग्स :Studentविद्यार्थीChalisgaonचाळीसगाव