शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या सावटातही अक्षय तृतीयेमुळे घरोघरी उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 16:16 IST

खान्देशाच्या कृषी संस्कृतीशी नाळ जोडलेला लोकोत्सव म्हणून अक्षय तृतीयेला (आखाजीला) 'अक्षय' मानाचे पान आहे. यंदा मात्र कोरोनासोबत आलेल्या टाळेबंदीने या आनंदाची परीक्षा घ्यायचे ठरविलेले दिसते.

ठळक मुद्देबाजाराचे चित्र ‘निगेटिव्ह’तयार पुरणपोळी घेण्याकडे कलसोने खरेदीसाठी आॅनलाईनचा पर्याय

जिजाबराव वाघ चाळीसगाव, जि.जळगाव : खान्देशाच्या कृषी संस्कृतीशी नाळ जोडलेला लोकोत्सव म्हणून अक्षय तृतीयेला (आखाजीला) 'अक्षय' मानाचे पान आहे. यंदा मात्र कोरोनासोबत आलेल्या टाळेबंदीने या आनंदाची परीक्षा घ्यायचे ठरविलेले दिसते. टाळेबंदीची मासिकपूर्ती अनुभवणा-या घरांमध्ये अक्षयतृतीयेमुळे चांगलीच उभारी आल्याचे चित्र दिसून आले. बाजारात मात्र 'निगेटिव्ह' वातावरण होते. तयार पुरणपोळी घेण्याकडे गृहिणींचा कल असून सोने खरेदीसाठी दुकाने बंद असली तरी 'आॅनलाईन खरेदी'चे दालन मात्र उघडे झाले आहे.वैशाख शुद्ध तृतीयेलाच 'अक्षय तृतीया' म्हणतात. साडेतीनपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणूनही आखाजीचे विशेष महत्व आहे. शेतकरी याच दिवशी नविन वर्षाची सुरुवात करतात. शेती हंगामाच्या नियोजनाचा मुहूर्तही अक्षय तृतीयेलाच असतो. बाजारालादेखील आखाजीमुळे तेजीची झळाळी येते. यंदा मात्र चित्र काहीसे वेगळे आहे. बाजार 'कुलूपबंद' असून आर्थिक चक्र उसवल्याने शेतकरीही अडचणीत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेवर कोरोनाचे सावट गडद झाले आहे. पूर्वसंध्येला शनिवारी 'मातीच्या' घागरी घेण्यासाठी तुरळक प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले.गेल्या अनेक वर्षात नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने पांगलेली कुटुंंबे एकत्र आली असून घरे मौजमस्तीने खुलून गेली आहेत. अक्षय तृतीयेमुळे घरोघरी काहीअंशी आनंदाची उभारी आली आहे. मात्र प्रत्येकाच्या मनात कोरोनाच्या भीतीचा 'सल' कायम आहे. कोणताही सण मात्र जगण्याचा आणि लढण्याचा मंत्र रुजवून जात असतो.'सण आखाजी मोलाचासणांमध्ये जो तोलाचादुर्दम्य आशावाद देतोलढण्याचा - जगण्याचा'यावर्षी अक्षय तृतीया हाच संदेश घेऊन आली आहे.वाहनांच्या खरेदीला ब्रेक, सोने खरेदी 'आॅनलाईनने'आखाजीला खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात. दिलेले दान, केलेले धार्मिक विधी यांचा क्षय होत नसल्याची परंपरा आहे. यामुळेच नवीन वास्तू प्रवेश असो की उद्घाटने, वाहन खरेदी अक्षय तृतीयेच्या मृहूर्तावरही मोठ्या प्रमाणात होते. सोने खरेदी केली जाते. टाळेबंदी असल्याने दुचाकी, चारचाकी वाहन खरेदीचे बेत अनेकांनी पुढे ढकले आहे. नवीन वास्तू प्रवेशही लांबले आहेत. सोने खरेदीसाठी मात्र काहींनी आॅनलाईन पर्याय वापरल्याचे सराफ व्यापा-यांनी सांगितले. टाळेबंदी नंतरही लगेच सोने खरेदी होणार नाही. त्यासाठी दिवाळीपर्यत वाट पाहवी लागेल, असे सुवर्ण व्यापा-यांचे म्हणणे आहे.मातीच्या घागरीचे दरही वधारलेखान्देशात पित्तरांचे स्मरण म्हणून घागर भरतात. पुरणपोळी व आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवला जातो. यावर्षी टाळेबंदीमुळे घागर तयार करणारे कुंभारवाडे शांत होते. थेट मध्यप्रदेशातून तयार घागरी विक्रीसाठी आल्या. वाहतुकीचा खर्च वाढल्याने ८० रुपये नग असे घागरीचे दर उसळी घेऊन होते. गेल्या वर्षी घागर ६० रुपयांना विकली गेली.टाळेबंदीमुळे कोकणचा राजा 'हापूस' विक्रीसाठी दारापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे हापूस खरेदीची लयलूट सुरू आहे.आंब्याचा रस आणि खापरावरची साजूक तूप टाकलेली खमंग पुरणपोळी हा अक्षय तृतीयेचा खास नैवेद्य. गेल्या काही वर्षात घरगुती आणि बचत गटांमार्फतही तयार पुरपोळी मिळू लागली आहे. ६० रुपये प्रति नगाप्रमाणे आॅर्डरप्रमाणे पुरणपोळ्या बनवून मिळतात. शनिवारी दिवसभर घरगुती पुरणपोळी तयार करुन विक्री करणा-या महिलांची लगबग सुरू होती.'जग रहाटी चालीनसण येतीन - जातीनंनात नव जुन व्हईनअंकुर जगाना फुटीनं'अशी सकारात्मक यावर्षी आखाजीने जागवली आहे. कोरोनाने भयग्रस्त असणा-या वातावरणात हे मोलाचे ठरते.लेकीबाळी अडकल्या 'टाळेबंदीत'आखाजी व दिवाळी म्हणजे सासुरवाशिणींच्या मैत्रिणीचं. आखाजीचा सण जवळ येऊ लागला की सासरी गेलेल्या लेकीबाळींना माहेराची ओढ लागते. यावर्षी टाळेबंदीमुळे गावोगावच्या सीमा बंद केल्याने सासुरवाशिणी सासरीच अडकल्या आहेत. ग्रामीण भागात आखाजीच्या काही दिवस अगोदरच मुली व महिला झोके बांधून अहिराणी गाणी म्हणतात.त्यात भाऊराया घेण्यास येणार असल्याचे कौतुक असते.'भाऊ मना टांगाज टांगाज जपूस रे बा...बहीण मनी गय्यर गय्यर रडस रे बा...'वृक्षांची डेरेदार सावली आणि झोक्यांची उंच झेप घेत म्हटलेल्या गाण्यांचे स्वर यंदा कानी पडत असले तरी त्यांचा आवाज कमी झाल्याचे जाणवले.'अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खायवकैरी फुटनी खडक फुटना, झुय झुय पानी व्हायवंझुय झुय पानी व्हाय तठे कस्साना बाजार वंमाय माले टिपऱ्या ली ठेवजो बंधूना हाते दी धाडजो...' अशा अहिराणी गीतांचा साखर गोडवा यामध्ये आहे. संकट कोणतही असो परंपरा आणि लोकोत्सव टिकून राहतात ते त्यांच्या काळसापेक्षतेमुळे. कोरोनाकळा असलेली यंदाची आखाजीदेखील याला अपवाद ठरू शकत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChalisgaonचाळीसगाव