शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात चोरट्यांनी संपूर्ण घर शोधूनही चार लाखांचा ऐवज सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 13:19 IST

एकाच रात्री तीन घरफोड्या

जळगाव : चोरट्यांनी शिक्षकवाडीतील सेवानिवृत्त प्राध्यापक अशोक जनार्दन चौधरी यांचे बंद घर फोडले. घरातील सर्व कपाट फोडले, त्यातील साहित्य घरात फेकले..डब्बे, बेड याचीही तपासणी केली, मात्र तरीही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. चौधरी यांनी हुशारीने ठेवलेले ६५ हजार रुपये रोख व सोने चांदीचे दागिने असा चार लाखाचा ऐवज सुरक्षित राहिला आहे.रिंगरोड परिसरातील शिक्षकवाडीत मु. जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. अशोक जर्नादन चौधरी हे पत्नी वसुधा वास्तव्यास आहेत. त्याचे पियुष व अंकुश हे दोन्ही मुले पुणे येथे वास्तव्यास आहेत. एक डॉक्टर तर दुसरा अभियंता आहे. ३० आॅगस्ट रोजी गणेशोत्सवाच्या पाशर््वभूमीवर चौधरी दाम्पत्य हे पुणे येथील मुलांकडे गेले आहेत. शेजारील रहिवाशांना मंगळवारी त्यांच्या मागच्या दरवाजा तुटलेला दिसल्याने घरफोडीचा प्रकार उघड आला. शेजारच्यांनी तत्काळ चौधरी यांना फोनवरुन घटना कळविली. चौधरी यांनी त्यांचे जळगावातील व्याही प्रमोद पाटील व नातेवाईक राजेंद्र खडके यांना प्रकार कळवून घरी पाठविले. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठले.आनंद कॉलनीतील बंद घरे फोडलीतालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत दादावाडी परिसरात आनंद कॉलनीत सुभद्राबाई मधुकर चौधरी व त्यांचे शेजारी भगवान आनंदा हरणे यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडले. सुभद्राबाई यांच्या घरातून चोरट्यांनी पाच हजाराची रक्कम लांबविली आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी सुभद्राबाई गणेश कॉलनीत मोठ्या मुलीकडे गेल्या होत्या. हरणे बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातील किती ऐवज चोरी झाला ते कळू शकले नाही.जेवणावर ताव मारुन चोरटे खाली हात परतलेचौधरी यांचे व्याही प्रमोद पाटील व राजेंद्र खडके आल्यावर त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी फ्रीज, देव्हारे, बेड, तसेच कपाटे अशा सर्व वस्तूंमधील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. त्याची माहिती खडके यांनी चौधरी यांना दिली. दाम्पत्याने जाण्यापूर्वी त्यांचे दागिने व ६५ हजाराची रोकड असलेली पेटी कपाटाच्या खाली एका कोपऱ्यात ठेवली होती. त्याबाबत खात्री करायला सांगितले असता ती पेटी सुरक्षित होती. ती चोरट्यांच्या हाती लागली नाही. त्यात शंभर, ५० व १० रुपयांच्या नव्या कोºया नोटांचे बंडल होते. हा ऐवज सुरक्षित असल्याने खडके यांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेत चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. मात्र जातांना त्यांनी जेवणावर ताव मारला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव