लहानपणीच पितृ छत्र हरपलेल्या सरफराजलाही काळने हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 05:09 PM2021-02-15T17:09:51+5:302021-02-15T17:10:44+5:30

घरातील होता कर्ता

Even Sarfaraz, who lost his father's umbrella as a child, was deprived of time | लहानपणीच पितृ छत्र हरपलेल्या सरफराजलाही काळने हिरावले

लहानपणीच पितृ छत्र हरपलेल्या सरफराजलाही काळने हिरावले

Next

रमेश पाटील

केऱ्हाळा, ता.रावेर :  लहानपणीनच पितृ छत्र हरवलेला येथील बत्तीस वर्षीय सरफराज तडवी शिक्षित होता . मोलमजुरी करीता पपई भराई भरण्यासाठी तो गाडीवर गेला होता . पोटाला रोजगार देणारी गाडीच जीवावर उठेल अशी कल्पनाही  डोक्यात आली नसेल , मात्र याच गाडीने क्षणात होत्याचे नव्हते केले . 
किनगाव जवळील अपघातात घरातील एकमेव कर्ता सरफराजवर काळाने क्रूर घाला घातला. त्याच्या  पश्चात आई , पत्नी, चार वर्षाच्या आतील दोन मुली असा परिवार  असून हेह सर्व कुटुंब पोरकं झाल्याची दुर्दवी वेळ आली आहे . त्याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . के-हाळे खुर्द येथील एकूण तीन मजुरांपैकी सरफराज अपघातात मृत्यु पावला तर सत्तार तडवी व युनूस तडवी हे सोबतीला असलेले मित्र जखमी असून उपचार घेत आहेत .

Web Title: Even Sarfaraz, who lost his father's umbrella as a child, was deprived of time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.