शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतरही ना जनता सुरक्षित, ना वाघ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 18:19 IST

गेल्यावर्षी धुलीवंदनाच्या दिवशी डोलारखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या ६५ वर्षीय लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याची शिकार करून पट्टेदार वाघाने रक्तरंजित धुळवळ उडविली होती. यानिमित्ताने शेतकरी सुरक्षित राहिले पाहिजे आणि वाघांचेही जतन व्हायला पाहिजे, असा टाहो फोडला गेला. वनविभागाच्या वरिष्ठांचे दौरे, वन्यजीव अभ्यासक, वन्यप्रेमी संस्था इकडे केंद्रीत झाल्या. १ एप्रिलला व्याघ्र पंचायत परिषद डोलारखेडा येथे पार पडली. अशा स्वरूपात भेटी आणि गाड्यांचा धुराळा पाहून येथील ग्रामस्थांना आता आपण सुरक्षित झाल्याचा भास झाला, तर वनविभागाने वाघ संरक्षित झाल्याचे चित्र उमटविले. वर्ष उलटले. प्रत्यक्षात शेतकरी आणि वाघ दोघे येथे असुरक्षित असल्याचे वास्तव कायम आहे.

ठळक मुद्देडोलारखेडा शिवारातील नागरिकांमध्ये भीतीजंगलात पाणवठे कोरडेप्राणी मानवी वस्त्यांकडेप्रशासकीय स्तरावर निर्णय होऊन समस्यांचा साक्षमोक्ष लावावाजेणेकरून आम्हाला इतरांप्रमाणे सुरक्षित जीवन जगता येईल, जनतेची अपेक्षा

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : गेल्यावर्षी धुलीवंदनाच्या दिवशी डोलारखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या ६५ वर्षीय लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याची शिकार करून पट्टेदार वाघाने रक्तरंजित धुळवळ उडविली होती. यानिमित्ताने शेतकरी सुरक्षित राहिले पाहिजे आणि वाघांचेही जतन व्हायला पाहिजे, असा टाहो फोडला गेला. वनविभागाच्या वरिष्ठांचे दौरे, वन्यजीव अभ्यासक, वन्यप्रेमी संस्था इकडे केंद्रीत झाल्या. १ एप्रिलला व्याघ्र पंचायत परिषद डोलारखेडा येथे पार पडली. अशा स्वरूपात भेटी आणि गाड्यांचा धुराळा पाहून येथील ग्रामस्थांना आता आपण सुरक्षित झाल्याचा भास झाला, तर वनविभागाने वाघ संरक्षित झाल्याचे चित्र उमटविले. वर्ष उलटले. प्रत्यक्षात शेतकरी आणि वाघ दोघे येथे असुरक्षित असल्याचे वास्तव कायम आहे.१४ हजार हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वढोदा वनपरिक्षेत्र पट्टेदार वाघाचे प्रजनन क्षेत्र बनले आहे. या गौरवावर २००२ साली शिक्कामोर्तब झाले. डोलारखेडाजवळ मरिमाता मंदिरालगत तीन छाव्यांना वाघिणीने जन्मास घातले होते. यानंतर आठ वर्षांपूर्वी सुकळी शिवारात नाना चव्हाण यांच्या शेतातही वाघिणीने दोन पिल्लांना जन्म दिले होते. या दोन्ही घटनेची नोंद वनविभागाकडे आहे.वढोदा वन परिक्षेत्रात वाघाच्या अधिवासासोबत बिबट्याचे अस्तित्वही जुनेच विस्तीर्ण अशा या जंगलात वन्यसंपत्ती व वन्यजीवाचा अधिवास वैभवशाली होय.वाघांच्या अधिवासामुळे या भागातील ग्रामस्थ वनसंगोपनाबाबत कमालीचे जागरूक आहे तर वन्यजीव व वन्यसंपत्तीसाठी या भागातील वनसमित्याचे कार्यही कौतुकास्पद आहे. वन्यजीवांचा अधिवास हा तालुकाच नव्हे तर जिल्ह्यासाठीही गौरव होय. त्यामुळे वनपरिक्षेत्रालगतच्या गावातील नागरिकांनी जंगलासोबत जीवनमान जुळवून घेतले आहे. परंतु वर्ष २०१८ मध्ये ऐन धुलीवंदनाच्या दिवशी शेतकरी लक्ष्मण जाधव यांचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला. त्यांना वनविभागाने आठ लाखांची मदत केली. या दुर्दैैैवी घटनेपूर्वी कधीही वाघ किंवा बिबट्याने येथे मनुष्यावर हल्ला चढविला नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीती नव्हती. परंतु या घटनेमुळे नागरिक व शेतकरी वर्षभरापासून दहशतीत आहे. असे असताना गेल्या वर्षभरात दोन पट्टेदार वाघ दगावले तर तीन जण वाघाच्या हल्ल्यात जखमी झाले. वाघ दगावले तर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले आणि इकडे शेतकऱ्यांची उभी पिके वन्यप्राणी उद्ध्वस्त करताहेत, नुकसानभरपाई मात्र तोकडी मिळत आहे.आजही जंगलात पाणवठे कोरडे असल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी नागरी वस्त्या, शेती शिवार व पूर्णा नदी पात्राकडे वळताहेत आणि शेतकरी जीव मुठीत घेऊन शेती कसताहेत. मयत शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदती पलीकडे या भागातील शेतकºयांना दोनशे पाच एकर जमिनीचे पुनर्वसन करून देणे, पुनर्वसन होत नाही तोपर्यंत सोलर कंपाउंड, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वनविकास योजनेची अंमलबजावणी, वन्यजीव प्रशिक्षित कर्मचाºयांची नेमणूक, मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन आराखडा अशा उपाययोजनेतून या ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत आश्वस्त करण्यात आले. ग्रामस्थांनाही आकाश ठेंगणे झाले. परंतु आज प्रत्यक्षात ग्रामस्थांशी संपर्क साधला असता वस्तुस्थिती वेगळीच आहे. वाघाच्या संगोपनासाठी आमची २०५ एकर शेतजमीन द्यायला आम्ही तयार आहे, मात्र मोबदला अथवा पुनर्वसनाबाबत वनविभाग स्तरावर शून्य प्रतिसाद आहे. अन्य आश्वासने हवेत विरली आहे. एकदा पुणे येथील सोलर फेंसिंगच्या कंपनीचे माणसे आलीत नंतर कधी दिसली नाहीत. वन्यप्राण्यांकडून शेती शिवारात सारखी नासधूस सुरू आहे. एकटा शेतकरी शेतात जाऊ शकत नाही. नुकसान भरपाई तोकडी व नावाला मिळत आहे. वरून वन्यप्राण्यांपासून धोका कायम आहे. नुकतेच नीलगायी मागे जंगलात वाघ लागला. भेदरलेल्या अवस्थेत नीलगाय गावात घुसली. ग्रामस्थांनी पकडून वनविभागाच्या ताब्यात दिली. अशा घटना सातत्याने घडतात. मग आम्ही सुरक्षित कसे? गावातील पशुधन, पाळीव कुत्रे हे आमचे रखवालदार रात्री बेरात्री वन्य प्राणी गावात घुसले की किमान ते आम्हाला दक्ष करतात. आता तरी प्रशासकीय स्तरावर निर्णय होऊन आमच्या समस्यांचे साक्षमोक्ष लावावा. जेणेकरून आम्हाला इतरांप्रमाणे सुरक्षित जीवन जगता येईल, अशी अपेक्षा डोलारखेडा येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :TigerवाघMuktainagarमुक्ताईनगर