शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ३६ दिवस उलटूनही ‘पणन’ च्या केंद्रावर कापसाचे एक बोंडही खरेदी नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 16:58 IST

शासनाकडून जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर ३६ दिवस उलटूनही एक बोंडही कापसाची खरेदी झालेली नाही.

ठळक मुद्देखाजगी केंद्रांवर ४ लाख गाठींची खरेदी अटी शिथिलनंतर ‘नाफेड’च्या केंद्रावर कडधान्यांची खरेदी जोरातबोंड अळीमुळे कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव,दि.१-शासनाकडून जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या पणन महासंघाच्या कापूस खरेदी केंद्रावर ३६ दिवस उलटूनही एक बोंडही कापसाची खरेदी झालेली नाही. त्या उलट खासगी कापूस केंद्रावर आतापर्यंत ४ लाख गाठींची खरेदी झाली आहे. यंदा कापसाला हवा तसा भाव न मिळाल्याने शेतक-यांनी ‘पणन’च्या केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. तर ‘नाफेड’च्या केंद्रांवर कडधान्य खरेदीच्या अटी शिथिल केल्यानंतर जोरात खरेदी सुरु झाली आहे.

जिल्ह्यात यंदा साडे चार लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता होती. त्या दृष्टीने ‘पणन’कडून जळगावविभागात ८ केंद्र सुरु करण्यात आली आहेत. तर सीसीआयकडून देखील १० केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र खासगी बाजारापेक्षा शासनाकडून कापसाला हमीभाव कमी  व खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणीची डोकेदुखी असल्याने शेतकºयांनी पणनच्या केंद्रावर पाठ फिरविली आहे.

बोंड अळीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यताजिल्'ातील ९० टक्के कापूस क्षेत्रावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कापूस उपटून फेकत आहे. त्यामुळेही यंदा ‘पणन’च्या केंद्रावर ठणठणाटच राहण्याची शक्यता आहे.  खान्देशात खासगी कापूस केंद्रावर १२ ते १३ लाख गाठींचे उदिष्ट आहे. मात्र बोंड अळीमुळे उत्पादनात घट होईल.

‘नाफेड’च्या केंद्रावर २ हजार क्विंटल उडीदची खरेदीशहरातील बाजार समितीत सुरु असलेल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांचा ओघ वाढू लागला असून, आतापर्यंत २ हजार ३०० क्विंटल उडीदची खरेदी झाल्याची माहिती खरेदी केंद्र प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. सुरुवातीला नाफेडच्या केंद्रावर उडीद, मुग मध्ये १२ टक्के पेक्षा कमी ओलसरपणा असल्यावरच खरेदी केली जात होती. मात्र  शेतकºयांनी अटी शिथिल करण्याची मागणी केल्यानंतर या ठिकाणी नाफेडच्या वतीने शेतक-यांचा माल मध्ये प्रतवारी केल्यामुळे शेतकºयांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक शेतकºयांनी उडीद विक्री केला आहे. २३६ क्विंटल मूगाची तर १७५क्विंटल सोयाबीनची खरेदी नाफेड केंद्रावर झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सुट्टी असल्यावर देखील नाफेड केंद्रावर कडधान्याची खरेदी सुरु होती.