शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

यावल येथील श्री स्वामिनारायण मंदिरात ब्रह्मवृंदाच्या मंंत्रोच्चारात देवतांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:44 IST

यावल शहरातील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवतांची प्राणप्रतिष्ठा वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांच्याहस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चाराच्या गजरात पार पडल्यांनतर शुक्रवारी ५६ नैवेद्य दाखवून राजभोग आरतीनंतर भाविकांच्या दर्शनार्थ मंदिर खुले करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे५६ नैवेद्य दाखवून राजभोगभाविकांच्या दर्शनार्थ मंदिर खुले१८ डिसेंबरपर्यत सुरू राहणार कार्यक्रम

यावल, जि.जळगाव : यावल शहरातील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवतांची प्राणप्रतिष्ठा वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांच्याहस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चाराच्या गजरात पार पडल्यांनतर शुक्रवारी ५६ नैवेद्य दाखवून राजभोग आरतीनंतर भाविकांच्या दर्शनार्थ मंदिर खुले करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमीत्ताने विविध कार्यक्रम सुरू असून, गुजरातसह राज्यातून हजारो भाविक व स्वामिनारायण पंथीय शास्त्री या कार्यक्रमास उपस्थित आहेत.गुरुवारी दुपारी वडताल संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. त्यांच्या आगमनानिमित्ताने शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी त्यांच्याहस्ते ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात यज्ञपूजा, व प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. शुक्रवारी देवतांना ५६ भोग नैवद्य चढवण्यात आला. त्यांनतर राजभोग आरती होऊन मंदिर दर्शनार्थ खुले करण्यात आले आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळयास १२ डिसेंबरपासून सुरवात झाली आहे. हा कार्यक्रम ते १८ डिसेंबरपर्यत सुरू राहणार आहे. मंंदिर आवारात संगीतमय श्रीमद् भागवत सप्ताह सुरू असून, यास शहरासह परीसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थिती देत आहेत.कार्यक्रमास स्वामिनारायण पंथाचे सर्वोच्च श्रध्दास्थान असलेल्या गुजरातमधील वडताल संस्थानचे गादिपती प.पू.ध.धू. १००८ आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांनी भेट दिली आहे. मंदिरात श्री स्वामिनारायण, श्री लक्ष्मीनारायण, श्री गणेश, हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे आयोजक श्री वासुदेव चरणदास महाराज आहेत. कार्यक्रमास के.के.शास्त्री, कृष्णजीवनदासजी महाराज यांच्यासह पंथाचे अनेक शास्त्रीजी उपस्थित आहेत. महोत्सवाचे मुख्य यजमान येथील प्रगतीशिल शेतकरी प्रमोद यशवंत नेमाडे, सहयजमान माणिक भिरूड, कथा यजमान घनश्याम जंगले, सहयजमान नितीन महाजन यासह विविध कार्यक्रमांच्या यजमानामध्ये सलील महाजन, निर्मल चोपडे, घाटकोपर महिला मंडळ, भूमिदान योगेश्श्वरदासजी महाराज, श्यामसुददास महाराज, वासदेवचरणदास माराज, प्रमोद नेमाडे, प्रमोद कोळंबे यांचा समावेश आहे. कार्यक्रमास शहरासह परिसरातील शेकडो स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमYawalयावल