शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कच्चे रस्ते असलेले तालुक्याचे शहर एरंडोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 19:15 IST

सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात.

एरंडोल : सामान्यपणे तालुक्याच्या शहरात सर्वत्र पक्के रस्ते असतात. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागात खेडोपाडी गावांतर्गत रस्ते पक्के झाले आहेत. मात्र एरंडोल येथे अजूनही नवीन वसाहतींमध्ये रस्ते कच्चे असल्याचे दिसून येते. सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या असलेल्या या वसाहतींमध्ये कच्चे रस्ते असल्यामुळे अनेक अडचणींना रहिवाशांना सामोरे जावे लागते.एरंडोल हे तालुक्याचे खेडे वजा शहर आहे. गेल्या ४५ वर्षात येथे अनेक नवीन वसाहती अस्तित्वात आल्या. त्यात मूळ शहरालगत असलेल्या रामचंद्र नगर, पद्मावती पार्क व सावतामाळी नगर या भागात अजूनही मातीचे रस्ते आहेत. तसेच आनंद नगर, गुरुकुल कॉलनी, साने गुरुजी कॉलनी, अष्टविनायक कॉलनी, इंद्रप्रस्थ नगर, काशी पुनमचंद नगर, ओम नगर, आदर्श नगर, हनुमान नगर या शहराच्या पश्चिम भागात कच्चा रस्त्यांमुळे रहिवासी जाम वैतागले आहेत.शहराच्या पूर्व भागात न्यू लक्ष्मी नगर, हिंगलाज कॉलनी, गणपती नगर, शंकर नगर, हरिओम नगर, न्यू साईनगर, प्रभा नगर या नवीन वसाहतींमध्ये बुद्धा कच्चा रस्त्यांची समस्या नागरिकांना भेडसावत आहे.विशेष हे की नवीन वसाहतींमधील रहिवाशांनी वेळोवेळी रस्ते पक्के करण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाला निवेदने दिली आहेत, असे नागरिकांनी सांगितले.विशेषतः पावसाळ्यात चिखलातुन पाण्याची डबकी यातून नागरिकांना वृद्धांना शाळकरी मुलांना मार्ग काढावा लागतो.ह्यहरवली वाट ,सापडेना चाल, तरी म्हणा नव्या शतकाकडे वाटचालह्ण अशा संतप्त आशयाच्या प्रतिक्रिया पावसाळ्यामध्ये या नवीन वसाहतींमधील नागरिकांच्या ऐकायला मिळतात. आमच्या पेक्षा खेड्यातील लोक बरे कारण खेडोपाडी गावात पक्के रस्ते झाले आहेत पण एरंडोल हे तालुक्याचे नगरपालिकेचे कार्यक्षेत्राचे शहर असूनही याठिकाणी कच्चा रस्त्याची समस्या भेडसावत आहे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे, असा सूर उमटत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाErandolएरंडोल