शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

एरंडोलच्या कपाशी व्यापार्‍याच्या खुनाचे गूढ उकलले

By admin | Updated: February 12, 2015 13:36 IST

कपाशीचे व्यापारी बाळू दामू पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात एरंडोल पोलिसांना यश मिळाले असून पप्पू उर्फ नगराज महाजन व पंकज सुरेश धनगर यांनी बाळूला काठीने मारहाण करून ठार केले होते.

एरंडोल : कपाशीचे व्यापारी बाळू दामू पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात एरंडोल पोलिसांना यश मिळाले असून पप्पू उर्फ नगराज महाजन व पंकज सुरेश धनगर यांनी बाळूला काठीने मारहाण करून ठार केले व पोत्यात घालून पोते शिवून पाटाच्या वाहत्या पाण्यात टाकले. आधी बाळूचे प्रेत पाण्यात फेकलेव नंतर मोटारसायकल टाकली, असे तपासाअंती उघडकीस आले आहे.एरंडोल पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे यांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींनी दुचाकीचे शेतात पेट्रोल संपले असे सांगून पप्पू महाजन याने बाळूच्या मोटारसायकलवर बसून पप्पूच्या शेतात नेले. त्याठिकाणी पप्पू व पंकज यांनी बाळूला मारायला सुरुवात केली व बांधाला लागून असलेल्या पठाणच्या शेतात बाळूला ठार केले व पोत्यात भरून पोते शिवले, नंतर पप्पूच्या दुचाकीवर बाळूचे प्रेत नेऊन पाटाच्या पाण्यात टाकले. नंतर त्याची दुचाकीही पाटात फेकली. ही घटना ३0 जानेवारी रोजी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान घडली असल्याचे जबाब पोलिसांना मिळाले आहेत. दरम्यान, पंकज धनगर याला १0 फेब्रुवारी रोजी रात्री ९.२0 वाजता अटक करण्यात आली.मयताचा मोबाइल, मारेकर्‍याचा टी-शर्ट हस्तगत करण्यात आला आहे. अंजनी नदीच्या पुलाखाली रक्ताचे डाग असलेला टी-शर्ट पोलिसांना पप्पूने काढून दिला.जवखेडे शिवारातील बापू महाजन यांच्या शेतातील विहिरीतून मयताचा मोबाइल मिळून आला.पंकजला कोठडीपंकजला बुधवारी एरंडोल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. आधीचे संशयित आरोपी सचिन मराठे व पप्पू यांची पोलीस कोठडी उद्या संपणार असल्याने त्यांना पुन्हा कोर्टासमोर उभे करून कोठडी मागण्यात येणार आहे. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. पप्पूने पोलिसांना १२ हजार ९00 रुपये रोख काढून दिले. बाळूला ठार करण्यासाठी सचिनने पप्पू व पंकज यांना सुपारीदिली असावी असा संशय आहे. खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. आरोपींनी पाटाच्या पाण्यात टाकलेल्या काठय़ा व मयताचे बूट अजून सापडलेले नाही.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे, सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक एम.एस. बैसाणे व विजया अलोणे, दिनकर मांडोळे, मेहमूद पिंजारी, सुभाष धाबे हे तपास करीत आहेत. होमगार्ड छोटू पहेलवान यांनी विशेष सहकार्य केले.(वार्ताहर)

तडाखा..

धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे गव्हाचे पीक आडवे पडले आहे. बाळू दामू पाटील यांच्या खुनासाठी वापरलेले काही साहित्य अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही. त्यांचा शोध सुरू असून यात आणखी कुणाचा समावेश आहे काय? याचाही तपास सुरू आहे.