शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक - हर्षल विभांडीक यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 16:09 IST

समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक असल्याचे डिजिटल शाळा उपक्रमाचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देडिजिटल शाळा उपक्रमाचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी साधला संवादकळंत्री प्राथमिक विद्यालयाचे आयोजनसंस्थेच्या सर्व शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देणार - नारायणदास अग्रवालविद्यार्थ्यांच्या अभिनव प्रगतीसाठीच डिजिटल शिक्षण - डॉ.सुनील राजपूत

चाळीसगाव, जि.जळगाव : समर्थ राष्ट्र उभारणीसाठी शिक्षणातील भरीव कामगिरी तितकीच अत्यावश्यक असल्याचे डिजिटल शाळा उपक्रमाचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी येथे सांगितले.सी.आर.कळंत्री विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असून, देश प्रगतीपथावर नेण्यासाठी शिक्षण हा खरा केंद्रबिंदू राहिला आहे. शिक्षण क्षेत्रात दररोज काहीना काही नवीन घडत असते. त्या बदलाच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतातील शाळांना जगातील प्रगत देशातील शाळांशी जोडण्याची गरज आहे. जेणेकरुन बदलत्या जागतिक प्रवाहांशी त्यांची ओळख होईल. जिल्हा परिषदेसह अनेकविध भागातील मराठी माध्यमाची शाळा डिजीटल करणे हा त्यातीलच एक भाग राहिला आहे. शाळेत होत असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक असे सर्वांगीण संस्कारक्षम उपक्रम हे प्रशंसनीय राहिले आहे. यातूनच भारताला जागतिक पातळीवर समर्थ राष्ट्र म्हणून उभे करायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात भरीव काम केल्याशिवाय गत्यंतर नाही.यावेळी सी.आर.कळंत्री विद्यालयात डीजिटल कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायण अग्रवाल, सचिव डॉ.विनोद कोतकर, सी.आर.कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत, संचालक राजेंद्र चौधरी, मु.रा.अमृतकर, क.मा.राजपूत, सुरेश स्वार, योगेश अग्रवाल, प्राचार्य मिलिंद बिल्दीकर, मुख्याध्यापक प्रमोद दायमा आदी उपस्थित होते.महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मेहता आॅडीटोरीयम सभागृहात सोमवारी सकाळी ९ वाजता वर्षभरात शाळेमध्ये झालेल्या विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, आदर्श विद्यार्थी अशा सर्व क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रमोद दायमा यांनी, तर सूत्रसंचालन स्मिता चित्ते, मनीषा पाटील यांनी, तर दीपाली पाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव