शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार अर्जावर सही केल्याने कुसुंबा येथे उद्योजकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 12:08 IST

कंपनीतून बाहेर ओढून केली मारहाण

जळगाव : कुसुंबा येथील पोलीस पाटलाच्याविरोधात केलेल्या तक्रारी अर्जावर सही का केली या कारणावरुन साहेबराव जगन पाटील (४४, रा.कुुसुंबा, ता.जळगाव) या उद्योजकाला एमआयडीसीतील कंपनीत येवून रवींद्र उर्फ भुरा शांताराम कोळी (रा.कुसुंबा) व दत्ता उर्फ गोलु चौधरी यांनी मारहाण केल्याची घटना ५ रोजी रात्री ८ वाजता घडली. शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.साहेबराव पाटील यांची एमआयडीसीत सेक्टर व्ही-९४ मध्ये पीव्हीसी पाईप बनविण्याची कंपनी आहे. ५ रोजी रात्री ८ वाजता कंपनीत असताना राहूल रामचंद्र बºहाटे (रामेश्वर कॉलनी) व दत्ता उर्फ गोलु चौधरी (रा.तुकारामवाडी) असे दोघं जण दुचाकीवर आले. दोघांनी कार्यालयातून कॉलर पकडून पाटील याना बाहेर आणत असतानाच तेथे राजेंद्र दिलीप चौधरी हा देखील कंपनीच्या आवारात आला. तिघांनी पाटील यांना कपंनीच्या प्रवेशद्वाराजवळ आणले असता तेथे बाहेर रवींद्र उर्फ भुरा शांताराम कोळी (रा.कुसुंबा) हा उभा होता. त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन पोलीस पाटील यांच्याविरोधात केलेल्या तक्रार अर्जावर तु सही केली म्हणून दत्ता चौधरी याने मारहाण केली.चाकूचा धाक दाखवून धमकावलेही घटना पाहून पाटील यांचा भाचा सागर पंडीत पाटील हा धावत आला व समजाविण्याचा प्रयत्न करीत असताना दत्ता याने त्यालाही धक्का मारुन तु आमच्या भांडणात पडू नको असे म्हणत असताना राहूल रामचंद्र बºहाटे याने चाकूचा धाक दाखवून भावलाल नामदेव पाटील याच्या नादी लागू नको, त्याला आम्ही रविवारी मारणार आहोत असे म्हणत आमच्याविरुध्द पोलिसात तक्रार दिली तर जीवंत सोडणार नाही अशीही धमकी दिली. या घटनेनंतर साहेबराव पाटील यांनी शुक्रवारी रात्री तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास गणेश कोळी करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव