शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

प्रवेश सोहळा मुक्ताईनगरला, पडसाद जामनेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:17 IST

भाजपने या पक्ष प्रवेशाचे " राष्ट्रवादीचे उसने अवसान " या शब्दात वर्णन केले, तर " ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है ," अशी कोपरखळी राष्ट्रवादीने मारली.

जामनेर, जि.जळगाव : मुक्ताईनगर येथे मंगळवारी जामनेर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी माजी मंत्री गिरीश महाजन याना दिलेला धक्का असे वर्णन केले जात आहे. भाजपने या पक्ष प्रवेशाचे " राष्ट्रवादीचे उसने अवसान " या शब्दात वर्णन केले, तर " ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है ," अशी कोपरखळी राष्ट्रवादीने मारली.खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर महाजन जिल्ह्यात घेतलेल्या बैठकीत खडसे यांच्या प्रवेशाने भाजपला भगदाड नव्हे छिद्रदेखील पडणार नाही, असे सांगत होते. मुक्ताईनगरमध्ये महाजन यांचे तेथील भाजप कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत खडसेंच्या जिव्हारी लागले. त्याचीच परतफेड म्हणून की काय तालुक्यातील सुमारे २०० भाजप कार्यकर्त्यांना खडसे यांच्या मुक्ताईनगरमधील फार्म हाऊसवर प्रवेश देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी हैप्रवेश जरी मुक्ताईनगरात झालेला असला तरी याची जळजळ आणि मळमळ मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जामनेरात भाजपला होत होती. भाजपचा बालेकिल्ला म्हणवून घेत असलेल्या महाजनांच्या मतदारसंघात. प्रवेश केलेले कार्यकर्ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते, मात्र निवडणूक जवळ आल्यानंतर धाकदपटशाही, साम-दाम-दंड-भेद नीती वापरून त्यांना राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यास भाग पाडले होते. दुखावलेले व नाराज कार्यकर्ते भाजपमधून बाहेर पडायला सुरुवात झाली असून, मुक्ताईनगरचा सोहळा ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है.- किशोर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख, जामनेर" चांगदेव मुक्ताबाईला जाण्याचे सांगुन राष्ट्रवादीत ओढलेदेवपिंप्री, नेरी येथील एकाही भाजप कार्यकर्त्याने पक्ष सोडलेला नाही. घरच्या भाकरी खाऊन गिरीश महाजनांसाठी झटणारे कार्यकर्ते भाजपात आहे. ज्यांनी प्रवेश केला ते राष्ट्रवादीचेच होते. महिला व लहान मुलांना चांगदेव मुक्ताबाईच्या दर्शनाला चला, असे सांगून नेले व जबरजस्तीने त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा रुमाल टाकून प्रवेश करवून घेतला.-तुकाराम निकम, माजी तालुकाध्यक्ष, भाजप, जामनेर

टॅग्स :PoliticsराजकारणJamnerजामनेर