शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शिरसोली येथे मराठा व हटकर समाज मेळाव्यात शिक्षण व संघटनावर प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 17:37 IST

दक्षिणी मराठा समाज व हटकर समाजाचा मेळावा शिरसोली येथे नुकताच झाला. यावेळी समाजातील संघटन व शिक्षणाबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देदक्षिणी मराठा समाजातर्फे सत्कार कार्यक्रमहटकर समाज मंदिरासाठी १० लाखांचा निधीसमाज मेळाव्यात शिक्षण व संघटनावर प्रबोधन

आॅनलाईन लोकमतशिरसोली, ता.जळगाव, दि.१ : येथील दक्षिणी मराठा समाज व हटकर समाजाचा मेळावा शिरसोली येथे नुकताच झाला. यावेळी समाजातील संघटन व शिक्षणाबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मराठा समाज व हटकर समाजातर्फे तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.दक्षिणी मराठा समाजातर्फे सत्कार कार्यक्रमदक्षिणी मराठा समाजातर्फे शिरसोली प्र.न. येथे २९ रोजी घेण्यात आलेल्या मेळाव्यात सत्कार व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मराठा उद्योजक विकास मंडळाचे सचिव विष्णु बाळदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँक संचालक सतीश देवकर, डॉ.धनंजय बेंद्रे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, सरपंच माया बोबडे, मराठा समाज जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष उमाजी पानगळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन संजय सूर्यवंशी यांनी तर आभार गणेश बोबडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विजय मराठे, विलास बोबडे, शांताराम ढेंगळे, भगवान जाधव, वाल्मिक साबळे, पंढरीनाथ बोबडे, किशोर चौथे, भागवत मराठे, भागवत धामणे यांनी परिश्रम घेतले.

हटकर समाज मंदिरासाठी १० लाखांचा निधीहटकर समाज प्रगती संस्थेतर्फे रविवार ३१ रोजी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे माजी महापौर सदाशिव ढेकळे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, शेतकी संघाचे संचालक राजु धर्मा पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नरेंद्र कोळी, माजी उपसरपंच शेनफडू पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, अनिल बारकू पाटील, हटकर समाज प्रगती संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, पोलीस पाटील श्रीकृष्ण वराडे, आर.के.पाटील, शिरसोली सरपंच यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी हटकर समाज मंदिरासाठी १० लाखांच्या निधीची घोषणा केली.

 

टॅग्स :Jalgaonजळगाव