शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सुधारीत बदल्यांच्या आदेशाने शिक्षकांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 12:39 IST

तगाद्याने राज्य समन्वयक वैतागले

ठळक मुद्देपोलीस कारवाईचा इशारादाद कुणाकडे मागावी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत घोळ झाल्याने संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ७३७ शिक्षकांच्या बदल्यांचे सुधारीत आदेश नुकतेच पारीत केले आहे. मात्र या आदेशातदेखील प्रचंड घोळ झाला असून पती-पत्नी एकत्र करणातील शिक्षकांचीच उचलबांगडी झाल्याने अनेक शिक्षक वैतागले आहे. त्यातच शिक्षकांना कुठेच दाद मिळत नसल्याने त्यांनी थेट पुण्याचे एनआयसी सेंटर गाठले. यामुळे राज्याचे बदली समन्वयक प्रदीप भोगले यांची डोकेदुखी वाढली असल्याने त्यांनी थेट शिक्षकांवर पोलीस कारवाई करण्याचा ईशारा दिला आहे. तसे पत्रदेखील शासनाने सीईओंना पाठविले आहे.१८ मे रोजी बदलीचे आदेश मिळालेल्या शिक्षकांची नावे विस्थापित शिक्षकांच्या यादीतही आल्याने त्यांची आधीच्या बदली आदेशाने दिलेली पदस्थापना रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ७३७ शिक्षकांना सुधारीत बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र शिक्षकांच्या सुधारीत आदेशातदेखील प्रचंड घोळ झाला आहे. विस्थापीतांच्या सुधारीत आदेशात अनेक नविन शिक्षकांची नावेदेखील यात वाढविण्यात आली आहे. त्यातच पूर्वी ज्या शिक्षकांचे पती-पत्नी एकत्रीकरण करण्यात आले होते व बदली झाली होती त्यात आता सुधारीत आदेशाने पतीची बदली दुसरीकडे तर पत्नीची बदली दुसरीकडे करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. काही शिक्षकांना तर नवीन फॉर्म भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. सुधारीत आदेशातदेखील अनेकांच्या बदल्या एनआयसीने रद्द केल्याने शिक्षक हैराण झाले आहेत.दरवर्षी शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ होत असल्याने यावर्षी शासनाने आॅनलाईन बदल्यांचे धोरण सुरू केले आहे. मात्र आॅनलाईन बदल्यांमध्येदेखील यावर्षी सर्वाधिक डोकेदुखी ठरली आहे. जून महिना उजाडत असला तरी शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ मिटता मिटत नसल्याची चिन्हे आहे.समन्वयक वैतागलेसुधारीत आदेशातदेखील प्रचंड घोळ होत असल्याने शिक्षकांची वेगवेगळ्या ठिकाणी उचलबांगडी होत आहे. त्यातच सीईओ, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी थेट एनआयसीकडे बोट दाखवित असल्याने शिक्षकांनी थेट पुणे येथील एनआयसी सेंटर गाठायला सुरूवात केली. त्यामुळे दररोजच्या तक्रारीने बदली समन्वयक वैतगाले आहे. दररोज शिक्षक समन्वयकांना फोन करून विचारणा करत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे.कारवाईचा ईशाराशासनाने ३१ रोजी राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देवून शिक्षकांच्या तक्रारीची बाब मांडली आहे. शिक्षक हे रोज एनआयसी पुणे येथे राज्य समन्वय प्रदीप भोसले यांच्याकडे जावून गर्दी करीत असून कामात व्यत्यय आणत आहे. तसेच दूरध्वनी वरूनदेखील विचारणा करीत आहे. त्याम्ुाळे आपल्या स्तरावरून शिक्षकांना सूचना करण्याचे आदेश आज अव्वर सचिवांनी सीईओंना दिले आहे. तसेच यापुढे एनआयसीमध्ये शिक्षक आल्यास पोलीस कारवाई करण्याचादेखील इशारा दिला आहे.दाद कुणाकडे मागावी - रवींद्र सोनवणेगेल्या २५ वर्षात शिक्षकांच्या बदल्यांमध्ये जेवढा घोळ झाला नाही तेवढा आॅनलाईन बदल्याच्या प्रक्रीयेत होत आहे. सुधारीतच्या नावाखाली आता पारदर्शकेतेवर शंका आहे. सीईओ व शिक्षणाधिकारी दाद देत नाही व एनआयसीकडे धाव घेतली तर त्यांच्याकडूनदेखील शिक्षकांवर पोलीस कारवाईची धमकी दिली जात असल्याने दाद मागायची कुणाकडे ? लोकशाहीच्या नावाखाली मोगलाई सुरू असल्याचा आरोप जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी केला आहे.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाJalgaonजळगाव