शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

इंग्रजीची प्रश्नपत्रिका १० रुपयात !

By admin | Updated: March 12, 2017 00:37 IST

५ केंद्रांवर कॉप्यांचा पाऊस : अर्ध्या तासात दहावीची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर

जळगाव : दहावीचा इंग्रजीचा पेपर शनिवारी झाला. पेपर सकाळी ११ वाजता सुरु होताच अवघ्या अर्ध्यार् तासात प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर आली. त्यानंतर तिच्या झेरॉक्स काढून १० रुपयात सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात सुरु होता. प्रश्नपत्रिका बाहेर आल्यानंतर उत्तरे तयार करुन विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यात येत होती. याकडे पोलीस, शिक्षण विभाग व शाळांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. कॉपी बहाद्दरांचा वर्गात प्रवेशशनिवारी  इंग्रजीचा पेपर असल्याने प्रशासनाकडून काही संवेदनशील केंद्रावर पेपर सुरु होण्याआधी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पेपर सुरु झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच या बंदोबस्ताची ‘ऐसी की तैसी’ केली. कॉपी बहाद्दरांनी वर्गात जावून प्रश्न पत्रिका बाहेर आणली व तिच्या झेरॉक्स करुन परीक्षा केंद्राबाहेर अक्षरश: बाजार मांडला होता.   काही केंद्रांवर वर्गांमध्ये शिक्षकांच्या परवानगीने सर्रासपणे कॉपी सुरु होती. प्रतापनगरात फोडली प्रश्न पत्रिकासंवेदनशील केंद्र असलेल्या प्रतापनगरातील एका केंद्रावर अर्ध्या तासातच वर्गातून प्रश्न पत्रिका बाहेर आली. त्यानंतर प्रश्न पत्रिकेची झेरॉक्स काढून गाईडच्या मदतीने संबधित प्रश्नांची उत्तरे परीक्षार्थीपर्यंत पुरविली जात होती. दरम्यान, ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रश्नपत्रिकेचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता युवकांनी परीक्षा केंद्रापासून पळ काढला. परीक्षा केंद्राच्या मागील बाजुच्या गेटव्दारे परीक्षार्थींना सर्रासपणे कॉप्या पुरविल्या जात होत्या. स्टेट बँकेनजीक असलेल्या एका शाळेबाहेर काही व्यक्तींकडून प्रश्नपत्रिकेतील काही प्र्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असल्याचा दावा करत दहा रुपयांमध्ये एक प्रिंट अशी विक्री केली जात होती. अशीच स्थिती विद्यानिकेतनच्या केंद्रावर देखील पहायला मिळाली. जिल्हा ग्र्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयाच्या भिंतीवर चढून वर्गांमध्ये कॉप्या पुरविल्या जात होत्या. स्मार्टफोनचा सर्रास वापरपरीक्षेदरम्यान स्मार्ट फोनचा वापर करण्यास मनाई असली तरी परीक्षा केंद्रामध्ये अनेक शिक्षकांनी स्मार्ट  फोन सर्रासपणे वापरले. तर परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात झेरॉक्सला बंदी असल्यावर सुध्दा नूतन मराठा महाविद्यालय, ए.टी.झांबरे विद्यालय, अ‍ॅग्लो उर्दू, का.ऊ. कोल्हे या विद्यालयाच्या परिसरात झेरॉक्सचे दुकाने सुरु होती. कॉपी पुरविण्यावरुन हाणामारीविद्यानिकेतन केंद्राच्या बाहेर कॉपी पुरविण्याच्या कारणावरून युवकांमध्ये हाणामारी झाली. जळगाव शहरासह तालुक्यातील कानळदा केंद्रावर देखील सर्रासपणे कॉपी सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले. १९ विद्यार्थ्यांवर कारवाई इंग्रजीच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या जिल्ह्यातील विविध केंद्रावर १९ विद्यार्थ्यांवर करण्यात आली. यावल येथील साने गुरुजी विद्यालयात ३ , किनगाव हायस्कूल येथे २, भुसावळ  शहरात १, भुसावळ तालुक्यातील किन्ही विद्यालयात २ विद्यार्थ्यांवर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी  तर भडगाव तालुक्यातील कोळगाव येथील केंद्रावर ७ तर गिरड  केंद्रावर ३ विद्यार्थ्यांवर प्राथमिकचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी कारवाई केली. तर बामणोद परीक्षा केंद्रावर १ विद्यार्थ्यांवर राज्य परीक्षा मंडळाच्या सदस्या शुभांगी राठी यांनी कारवाई केली आहे. हुशार विद्यार्थ्यांना त्रास कॉपीमुक्त अभियानाचा शहरात फज्जा उडाला आहे. अनेक केंद्रांवर तुकड्या कमी होण्याच्या भितीने सर्रास कॉपी सुरु आहे. त्याचा नाहक त्रास हुशार विद्यार्थ्यांना होत आहे. शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे.