शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

इंजिनिअर्स डे विशेष : अभियांत्रिकी क्षेत्र अधिक विस्तारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 14:30 IST

नॅनोटेक्नॉलॉजीलाही आगामी काळात महत्व असेल, असा सूर अभियंत्यांनी 'इंजिनिअर्स डे'च्या पूर्वसंध्येला सोमवारी 'लोकमत'शी बोलताना ऐकवला.

ठळक मुद्देमुलींचेही प्रमाण वाढलेनॅनोटेक्नॉलॉजी होणार व्यापक अभियंत्यांचा सूर

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव, जि.जळगाव : तंत्रज्ञानाच्या कक्षा झपाट्याने विस्तारल्या जात आहे. याला कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही. अभियांत्रिकी क्षेत्राच्या परिघातही असे अनेकविध नवे बदल दिसून येत आहे. मुलींचादेखील या क्षेत्राकडे ओढा वाढला आहे. नॅनोटेक्नॉलॉजीलाही आगामी काळात महत्व असेल, असा सूर अभियंत्यांनी 'इंजिनिअर्स डे'च्या पूर्वसंध्येला सोमवारी 'लोकमत'शी बोलताना ऐकवला.प्रसिद्ध अभियंते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा १५ सप्टेंबर हा जन्मदिवस 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो. गत १० वर्षात अभियांत्रिकी वर्तुळात मोठे बदल झाले आहे. अभ्यासक्रम स्मार्ट झाला आहे. त्यामुळे कामाच्या पद्धतीतदेखील बदल अधोरेखित झाले. मात्र संगणकाचा शिरकाव झाल्याने कठोर मेहनत, ड्राईंगसाठी हातांचा उपयोग कमी झाला आहे. पूर्वी एखाद्या ड्राईंगमध्ये काही चूक असल्यास ते नवीन रेखाटण्याशिवाय पर्याय नव्हता. तथापि, संगणक, इंटनेटमुळे यावर मात करता आली आहे. 'अ‍ॅटोकॅड' सॉफ्टवेअरमुळे एकच ड्राईंग पुन्हा पुन्हा वापरणे शक्य झाले आहे. असे अनेक नावीन्यपूर्ण बदल यात झाले आहे. मात्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव जाणवतो, असे निरीक्षणही अभियंत्यांनी नोंदविले आहे. अंतर्गत मूल्यमापनातील गुणांमुळे 'उत्तीर्ण' होणे सोपे झाले असल्याचेही अभियंत्यांचे म्हणणे आहे.अ‍ॅडव्हान्स नॅनोटेक्नॉलॉजीचा वापरपूर्वी मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स व सिव्हील या तीन शाखांचा अभियांत्रिकीमध्ये समावेश होता. अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. गेल्या काही वर्षात या खिडक्या उघडल्या असून हे क्षेत्र अधिक विकसित होत आहे. अगामी काळात नॅनोटेक्नॉलॉजी, मेकॅक्ट्रॉनिक्स आणि मल्टिटास्किंग पद्धतीतील बदल आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधील विकास असणार आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक आणि परिश्रम करण्याची तयारी असणाºया तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे.विषयांची संख्या वाढलीअभियंत्यांमुळे देश ओळखला जात आहे. विषयांची संख्या वाढली आहे. कृषी, पर्यावरण क्षेत्रातही अभियांत्रिकी पाऊलखुणा उमटू लागल्या आहे. ‘आयटी’तील प्रगतीमुळे वेगाने बदलही होत आहे.पुढील काळात गुणवत्ताप्रधान व पर्यावरणाचा समतोल राखणारे बदलही अभियांत्रिकीत अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवणे व योग्य मनुष्यबळ निर्मितीला महत्व असणार आहे. मायक्रो प्रॉडक्टव्दारे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणाºया नॅनोटेक्नॉलॉजीला महत्व असेल.थ्रो आऊटचा शिरकाव अभियांत्रिकी क्षेत्रातही झाला आहे. त्यामुळे पुढील काळात मोठ्या संगणकांची गरज भासणार नाही. हातात मावेल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल. त्यासाठी अभ्यासक्रमात बदल करण्याची मुभा असावी, अशी अपेक्षादेखील अभियंत्यांनी व्यक्त केली.स्पर्धा परीक्षांकडे अधिक कलअभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढल्याने इंजिनिअर्सचे लोंढे बाहेर पडत आहे. हुशार आणि चतुरस्र इंजिनिअर्स स्पर्धा परीक्षांची वाट धरतात. त्यामुळे या क्षेत्रातील गुणवत्ताधारक मनुष्यबळ कमी होत आहे. इंजिनिअर्सची संख्या वाढल्याने बेरोजगारीची समस्या ऐरणीवर आली आहे. लॉकडाऊनचा फटकाही दीर्घ काळ जाणवणार आहे.- सुधाकर पालवे, सिव्हील इंजिनिअर्स, चाळीसगाव.बांधकाम क्षेत्रात झाले बदलअभियांत्रीकीतील नावीन्यपूर्ण बदलांचे ठसे बांधकाम क्षेत्रात उमटले आहे. सॅटेलाईटव्दारे सर्वेक्षण, कमी मनुष्यबळाचा वापर करुन धरणे, रस्ते, मोठे प्रकल्प उभारले जात आहे. यामुळे शासनाच्या पैशांसह वेळेचीही बचत होत आहे. बांधकांमध्ये यंत्राचा वापर होऊ लागल्याने कामे लवकर होताहेत. लॉकडाऊनमुळे घडी विस्कटली आहे.- सुनील बी. भावसार, सिव्हील इंजिनिअर्स, चाळीसगाव.