शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मे अखेर मनपाचे ५४ कर्मचारी होणार निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:12 IST

आधीच एक हजारहून जागा आहेत रिक्त

जळगाव : महापालिकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असताना दुसरीकडे ३१ मे पर्यंत मनपाचे ५४ कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे मनपाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाच वर्षापूर्वी स्थायी समितीच्या मंजुूरीने शासनाकडे पाठविण्यात आलेल्या २५८२ पदांच्या आकृतीबंधाला अद्याप मान्यता मिळालेली नाही.मनपात प्रत्येक वर्षी ७० हून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात. एकूण २८०० कर्मचाºयांची गरज असताना मनपात सध्या १७५० कर्मचारी कार्यरत आहेत. तब्बल १ हजारहून अधिक कर्मचाºयांच्या जागा रिक्त आहेत.कर्मचारीअभावी मनपातील अनेक कामांवर परिणाम झालेला दिसून येत आहे. मनपाचे क्षेत्र प्रत्येकवर्षी वाढत आहे. मात्र, कर्मचारी संख्या प्रत्येक वर्षी कमी होत आहे.२०११ मध्येच १११ जणांची केली होती भरतीमनपाची २००३ मध्ये स्थापना झाल्यानंतर केवळ २०११ मध्ये १११ जणांची भरती केली असून, त्या ऐवजी एकही वेळेस रिक्त जागा भरण्यात आलेल्या नाहीत.महापालिका झाल्यानतंर आस्थापनेतील कर्मचाºयांचा विभागनिहाय आकृतीबंधात देखील बदल करणे आवश्यक होते. मात्र, १५ वर्षांपासून मनपाने यामध्ये बदल देखील केला नाही. राजेंद्र पाटील आस्थापना अधिक्षक असताना महापालिका कर्मचाºयांचा आकृतीबंध तयार करण्यात आला.आकृतीबंध मान्यतेसाठी सभेत ठेवण्यात आला होता. त्यात दुरुस्ती करीत पदवीधर विधी विभागात शाखा प्रमुख, अधीक्षक, लिपीक व शिपाई यांची पदे वाढविण्यात आली. नगरसचिव विभागात २ लिपीक वाढविण्यात आले.प्रभाग समितीमध्ये ४८ ऐवजी ५२ लिपीक, ३७ ऐवजी ५३ शिपाई अशी दुरुस्ती सुचविण्यात आली होती.मनपातील कर्मचाºयांना दिले जाताहेत पदेमनपात अनेक कर्मचाºयांसह अधिकाºयांची पदे देखील रिक्त आहेत. यामध्ये अप्पर आयुक्त पद, १ उपायुक्त, ३ सहाय्यक उपायुक्त, मुख्य लेखापरीक्षक, नगरसचिव, आरोग्य अधिकारी, वाहन विभाग प्रमुख अशी अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या पदांवर मनपाकडून मनपातील क्लार्क, लिपीक, अभियंताना ही पदे देण्यात आली आहे. अनेकदा पात्र नसलेल्या महापालिकेतील कर्मचाºयांना पदभार देवून प्रभारी कारभारी करुन काम रेटून नेले जात असल्याचे भयंकर चित्र मनपात अनेक वर्षांपासून पहायला मिळत आहे. बहुतांश कारभारी प्रभारी असल्याने प्रशासकीय कामकाजात शिथिलता आली आहे.कंत्राट पध्दतीने भरणार जागाशासनाकडून आकृतीबंधाला मंजूरी मिळाली नसल्याने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महासभेत रिक्त जागा भरण्यासाठी कंत्राटीपध्दतीने कर्मचारी भरण्याचा ठराव करण्यात आला आहे. दरम्यान, या ठरावावर अंतीम प्रक्रिया झाली नसून, या प्रक्रियेला अजून सहा महिन्यांचा काळ जाणार आहे. कंत्राटी पध्दतीने कर्मचाºयांचा जागा भरल्या तर मनपाच्या कामात सुसुत्रता येण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव