शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कजगाव येथे चातुर्मासाची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 15:28 IST

कजगाव येथे चातुर्मासाची समाप्ती झाली.

ठळक मुद्देअनेक तपस्वींचा सत्कारमुस्लीम युवकानेही घेतली आयुष्यभर मांसाहार न करण्याची शपथ

प्रमोद ललवाणीकजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : येथील जैन स्थानकात चातुर्मास समाप्तीच्या आदल्या दिवशी अनेक तपस्वींचा सत्कार तसेच मुस्लीम युवकाने आयुष्यभर मांसाहार न करण्याची शपथ घेतल्याने त्याचाही सत्कार समाज बांधवांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  येथील जैन स्थानकात १६ जुलैपासून प.पू.विमलेशप्रभाजी म.सा. यशप्रभाजी म.सा. भक्तीप्रभाजी म.सा. यांच्या सानिध्यात चातुर्मास सुरू होता. यात सकाळी ६ वाजता प्रार्थना, ८.३० प्रवचन, दुपारी २ ते ४ अभ्यास वर्ग, सायंकाळी ७ वाजता प्रतिक्रमण याप्रमाणे संपूर्ण चातुर्मासात कार्यक्रम होत होते. चातुर्मास दरम्यान येथे अनेक तपस्या पार पडल्या. यात दोन मासखमण (३० दिवसाचे निरंकाळ उपवास), २१, १५, ११, ९, ८, ७, ५ दिवसाचे निरंकाळ उपवास याप्रमाणे २९ महिला व पुरुषांनी तपस्या केल्या, तर ६१ महिला व पुरुषांनी ३ दिवसांचे उपवास केले. तसेच आयंबील, एकासना, ब्यासना याप्रमाणेच अनेक तपस्या येथे चातुर्मासादरम्यान पार पडल्या. यात सहा वर्षाच्या बालकांपासून तर ९० वर्षांच्या वयोवृद्ध महिलांचाही सहभाग होता.चातुर्मासात होत असलेल्या प्रवचनात अनेक जैनेतर बांधव व महिला सहभागी झाले होते, तर येथील एक मुस्लीम समाजाचा तरुण भोजू मलिक याने आयुष्यभर मांसाहार न खाण्याची शपथ प.पू.विमलेशप्रभाजी म.सा. यांच्या सानिध्यात घेतली. याशिवाय अनिल महाजन व सागर कुमावत यांनी चातुर्मासात म्हणजे चार महिने मांसाहार न घेण्याची शपथ घेतली होती. तसेच अनेक जैनेतर महिला व पुरुषांनी संपूर्ण चार महिने जैन स्थानकात येऊन प्रवचनाचा लाभ घेतल्याने तसेच तपस्या करणारे महिला व पुरुषाचा सत्कार कजगाव जैन श्रावक संघाच्या वतीने हस्ते करण्यात आला.ताप्रसंगी चार महिने चाललेल्या चातुर्मास दरम्यान संपूर्ण देशभरातून अनेक जैन बांधव व महिलांनी साध्वींच्या दर्शनाचा लाभ घेत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.उपक्रम यशस्वीतेसाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष चेतनजी धाडीवाल यांच्यासह भारतीय जैन संघटना, जैन श्रावक संघ, जैन महिला मंडळ, जैन नवयुवक मंडळ व बहुमंडळ यांनी परिश्रम घेतले.जैन श्रावक संघ कजगावच्या वतीने भोजू मलीक या मुस्लीम युवकाचा विशेष सन्मान तसेच ३६ जैन व जैनेतर महिला व पुरुषाचा तपस्वी बहुमान व चातुर्मास सेवा सन्मानासाठी टॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBhadgaon भडगाव