शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

पारोळा येथे अतिक्रमण हटाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 22:42 IST

पालिकेच्या नवीन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.

ठळक मुद्देमुख्याधिकारी ज्योती भगत यांच्या विक्रेत्यांना कडक सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : पालिकेच्या नवीन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी शहरात अतिक्रमण हटावची मोहीम राबवली.

पारोळा शहरातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यात बाजारपेठेत रत्याच्या दोन्ही बाजूनी लहान मोठे पथ विक्रेते व हातगाड्या लागलेल्या असतात.त्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यास जागादेखील नसते. यामुळे दररोज किरकोळ वादविवाद होतात. ही समस्या सोडविण्यासाठी पारोळा पालिकेच्या नवीन रुजू झालेल्या मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी दिला. अतिक्रमण करणारे विक्रेते ठेलागाडी धारकांना कडक सूचना देत यापुढे जीएसपी प्रणालीचा वापर करणार असल्याचे संकेत दिले. यामुळे ठेलागाडी व अतिक्रमण, मध्येच दुकाने लावणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

येथील मुख्य बाजारपेठेत वाढते अतिक्रमण व बेशिस्त पार्किंग यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत. नेहमीच अतिक्रमणची ओरड होत होती. याबाबत नविन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी पदभार घेत पथ विक्रेतेसाठी निमावली लागू केली. या माध्यमातून पथ विक्रेत्यांना  विविध परवाने वाटप होतील. त्यात स्थिर ,फिरते व तात्पुत्या परवान्याचा समावेश राहणार आहे. त्यासाठी विशेष जीपीएस पद्धतीने ३१डिसेंबरपासून सर्व्हेक्षण सुरू होणार आहे.

पालिका शहरातील पथविक्रेत्यांना तीन वेगवेगळ्या प्रकारचे परवाने देणार आहेत. त्यासाठी ठरवून दिलेल्या निकषांनुसार प्रत्येक पथ विक्रेते मोबाईल क्रमांक हा आधारकार्डशी संलग्न असावा. त्यानुसार सर्व नियमावली तयार करण्यात येईल व कायमच्या अतिक्रमणाला ब्रेक व बेशस्त पार्किंगला लगाम लागेल, असे भगत यांनी सांगितले. अतिक्रमणधारकांना कडक इशारा देत नियमांचे काटेकोरपणे अमलबजावणी केली जाईल. बेशिस्तपणा अजिबात खपून घेतला जाणार नाही, असा दम त्यांनी भरला आहे. रोज सकाळी पाहणी करून कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी थांबून कारवाई होणार आहे. या कामात मुख्याधिकारी ज्योती भगत, अधिक्षिका संघमित्रा संदानशिव, राहुल पवार, पंकज महाजन, हिमतराव पाटील, तुकुडू नरवाले, संदीप पाटील व इतर कर्मचारी हजर होते.

टॅग्स :JalgaonजळगावParolaपारोळाMuncipal Corporationनगर पालिका