शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मानव व वन्यजीवांचा संघर्ष टाळण्यावर भर - उप वनसंरक्षक विवेक होशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 13:26 IST

वाघाचाही संचार वाढण्याचा विश्वास

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जंगलामध्ये वाढता मानवी हस्तक्षेप तसेच बिबटया असो अथवा इतर हिंस्त्र प्राणी यांचा मानवी वस्त्यांकडे वाढलेला संचार रोखून मानव व वन्यजीवांचा संघर्ष टाळण्यावर आपला भर राहणार असल्याची माहिती नवनियुक्त उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांनी दिली.जळगावचे उप वनसंरक्षक म्हणून होशिंग यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी वरील मनोदय व्यक्त केला. या वेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला संवाद....प्रश्न - मेळघाट ते वढोदा कॉरिडॉर प्रस्तावाची काय स्थिती आहे?उत्तर - वढोदा वनक्षेत्र ‘कॉन्झर्व्हेशन रिझर्व्ह’ म्हणून घोषित झालेले आहे. त्यानुसार त्या ठिकाणी विविध उपाययोजना केल्या जाणार असून त्याचा प्लॅनही पाठविण्यात आला असून चार कोटी रुपयांचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पाचाही प्रस्ताव पाठविला असून मेळघाट ते वढोदा कॉरिडॉरमुळे वाघांचा संचार वाढण्यास मदत होईल.प्रश्न - वनोत्सवावर कोरोनाचा परिणाम जाणवत आहे का ?उत्तर - हो नक्कीच. वन विभाग व सामाजिक वनीकरणकडून वृक्षांची लागवड केली जात आहे. मात्र रोपे उपलब्ध असले तरी नागरिक पुढे येत नाही. अजूनही त्यांच्या मनामध्ये भीती आहे. या बाबत दक्षता घेतलीच पाहिजे. मात्र सुरक्षितता बाळगत वृक्ष लागवडीसाठीही पुढे यावे.प्रश्न - जळगावातील लांडोरखोरी वनोद्यानात पासधारकांना परवानगी देण्यात येईल का?उत्तर - सध्या कोरोनामुळे जे निर्बंध आहे, त्यानुसार काम केले जाईल. सध्या फिरण्यासंदर्भात निर्बंध आहेत.गणेशोत्सवाच्या काळातच वनोत्सवाही सुरू आहे. या दोघांची सांगड घालत पर्यावरण रक्षणासाठी सर्वांना पुढाकार आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवातील निर्माल्यांच योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचे स्त्रोत दुषित होण्यापासून वाचविणे असे प्रयत्न झाल्यास वृक्षांनाही लाभ होईल. तसेच वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांनी केले आहे.प्रस्ताव पाठविलावढोदा ता. मुक्ताईनगर ते मेळघाट या दरम्यान व्याघ्र संचार प्रकल्पासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव