शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरातील स्थिती : कट्टर समर्थक आणि नंतर कट्टर वैरीही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:43 IST

अनिल पाटील, उदय वाघ यांच्यात होती स्पर्धा

जळगाव : एकेकाळी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ गेल्या काही वर्षात अमळनेरातील स्थानिक व जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे इतके दूर गेले की आजच्या स्थितीत दोघे एकमेकांचे कट्टर वैरी अशीच ओळख दोघांबाबत सांगितली जात आहे. त्याचे पर्यावसान अमळनेरातील व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याचे समोर आले आहे.अमळनेरातील राजकीय वाटचालीचा विचार करता डॉ. बी.एस. पाटील हे १९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीन पंचवार्षिक ते या मतदार संघातून आमदार होते. १९९५ च्या कालखंडात त्यांचे उजवे व डावे म्हणून परिचित होते ते अनिल भाईदास पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे दोघे.बी.एस.पाटील-उदय वाघ विळ्या भोपळ्याचे नाते१९९५ नंतर हळू हळू उदय वाघ व अनिल पाटील यांच्यात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले. ते इतके वाढले की उदय वाघ हे डॉ. बी.एस. पाटील यांच्यापासून दूर जाण्यास सुरूवात झाली. त्यांनी तत्कालीन मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जवळ जाण्यास सुरूवात केली. त्यानंतर बी.एस.पाटील हे भाजपाचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यांना पक्षाने २००७ मध्ये झालेल्या एरंडोल लोकसभा निवडणुकीची उमेदवारीही दिली होती मात्र ते त्यावेळी पराभूत झाले. दरम्यान भाजपातील पक्षांतर्गत राजकारणात गटबाजी वाढत गेली. यात डॉ. बी.एस. पाटील, अनिल भाईदास पाटील व उदय वाघ असे तीन गट निर्माण झाले व तिघांमधील वितुष्ट हे टोकाला गेले. पक्षांतर्गत कलहामुळे व उदय वाघ यांचे पारडे पक्षात जड झाल्याने दुखावलेले डॉ. बी.एस. पाटील यांनी भाजपाला त्यागून काही काळ कॉँग्रेसमध्ये घालविला. नंतर ते पुन्हा स्वगृही परतले.स्मिता वाघ यांच्या उमेदवारीने नाराजीलोकसभा निवडणुकीत पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यावर पक्षांतर्गत जणू उद्रेकच झाला. स्वत: गिरीश महाजन हेदेखील नाराज होते. उमेदवारी डावलली गेल्याने खासदार ए.टी. पाटील यांनी याबाबतच्या कटाचा आरोप उदय वाघ यांच्यावरच केला होता. त्या पाठोपाठ बी.एस. पाटील यांनी ए.टी. पाटील यांना समर्थन दिले. अमळनेरातून भाजपाचे सहयोगी आमदार शिरीष पाटील यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले होते. या सर्व नाराजीचे पर्यावसान स्मिता वाघ यांची उमेदवारी कापली गेली. तेव्हापासून उदय व स्मिता वाघ हे नाराज होते. पक्षाच्या कार्यक्रमांना जाणेही त्यांनी टाळले. मात्र अमळनेरात मेळावा असल्याने उदय वाघ हे अमळनेरला आले. बी.एस. पाटील यांना व्यासपीठावर घेण्यास त्यांचा विरोध होता मात्र गिरीश महाजन यांनी डॉ. पाटील यांना व्यासपीठावर घेतले व त्यातूनच हाणामारीचा प्रकार घडला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव